Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारातील खराब कामगिरीमुळे Mutual Fund मधील गुंतवलेला पैसा सुद्धा डुबणार?

काही दिवसांपासून शेअर बाजार खराब कामगिरी करत आहे, ज्याचा परिणाम म्युचल फंडवर सुद्धा होत आहे. म्हणूनच आज आपण गेल्या ६ महिन्यांत कोणत्या म्युच्युअल फंडाचे शेअर किती घसरले आहेत, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 29, 2025 | 11:10 PM
शेअर बाजारातील खराब कामगिरीमुळे Mutual Fund मधील गुंतवलेला पैसा सुद्धा डुबणार?

शेअर बाजारातील खराब कामगिरीमुळे Mutual Fund मधील गुंतवलेला पैसा सुद्धा डुबणार?

Follow Us
Close
Follow Us:

शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोकादायक मानले जाते, तर दुसरीकडे लोकं SIP म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानतात. परंतु, आता शेअर बाजारातील तीव्र घसरणीचा परिणाम एसआयपी गुंतवणूकदारांवरही दिसून येत आहे. शेअर बाजारातील घसरणीदरम्यान, गेल्या तीन महिन्यांत म्युच्युअल फंडांमध्येही सुमारे १० ते १५ टक्के घट झाली आहे. अशा परिस्थितीत, काही काळापूर्वी एसआयपीमध्ये गुंतवणूक करून ज्यांना फायदा मिळत होता त्यांचा पोर्टफोलिओ आता लालेलाल झाला आहे.

खरंच म्युचल फंडमधील पैसा डुबणार?

शेअर बाजारातील तीव्र घसरणीमुळे एसआयपी गुंतवणूकदारांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे, परंतु हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की एसआयपी ही दीर्घकालीन रणनीती आहे. जर तुम्ही तुमचा एसआयपी किमान ५-७ वर्षे टिकवून ठेवला तर तुम्हाला चांगले परतावे मिळण्याची शक्यता आहे. आज शेअर बाजार घसरला आहे, त्यामुळे एसआयपी नकारात्मक झाली आहे, परंतु कालांतराने जेव्हा शेअर बाजार वाढेल तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ पुन्हा ग्रीन होईल.

संयम राखणे महत्वाचे

सध्याच्या बाजार परिस्थितीत संयम राखणे महत्त्वाचे आहे असे तज्ञांचे मत आहे. आर्थिक सल्लागार म्हणतात की जर तुम्ही एसआयपीद्वारे नियमितपणे गुंतवणूक करत असाल तर तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू ठेवावी. दुसरीकडे, जर एखादा गुंतवणूकदार आर्थिक ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत असेल तर त्याने सावधगिरी बाळगली पाहिजे आणि योजना बनवली पाहिजे.

या म्युच्युअल फंडांमध्ये १५ टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली

ईटीच्या अहवालानुसार, गेल्या ६ महिन्यांत या इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये १५ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. गेल्या ६ महिन्यांत कोणत्या म्युच्युअल फंड किती टक्क्याने घसरला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.

  • क्वांट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड – १९.०८ टक्के
  • क्वांट अ‍ॅक्टिव्ह फंड – १८.३७%
  • क्वांट व्हॅल्यू फंड – १७.८२%
  • क्वांट फ्लेक्सी कॅप फंड – १७.६९ टक्के
  • सॅमको फ्लेक्सी कॅप फंड – १७.६५%
  • मोतीलाल ओसवाल फोकस्ड फंड – १७.५८ %
  • SAMCO ELSS टॅक्स सेव्हर फंड – १७.५२%
  • श्रीराम फ्लेक्सी कॅप फंड – १७.२१%
  • क्वांट मिड कॅप फंड – १७.०४%
  • श्रीराम ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड – १६.७०%
  • एनजे फ्लेक्सी कॅप फंड – १६.२०%
  • जेएम व्हॅल्यू फंड – १५.६१%
  • आयटीआय व्हॅल्यू फंड – १५.५९%
  • टॉरस मिड कॅप फंड – १५.४३%
  • क्वांट लार्ज आणि मिड कॅप फंड – १५.३५%
  • शेअर बाजार का सतत घसरत आहे?

भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीमागे अनेक प्रमुख कारणे आहेत. याचे पहिले कारण म्हणजे देशाच्या बाजारपेठेतून परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढले आहेत. याशिवाय, निफ्टी आणि सेन्सेक्स गेल्या काही काळापासून घसरणीचा सामना करत आहेत. त्याच वेळी, अमेरिकेतील वाढत्या व्याजदर आणि ट्रम्पच्या टॅरिफ धमकीसारख्या जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांच्या मनोबलावर परिणाम होत आहे. याशिवाय, महागाई आणि घटता विकास दर देखील बाजाराच्या स्थिरतेला आव्हान देत आहेत.

Web Title: Will the money invested in mutual fund also sink due to poor performance in the stock market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 11:10 PM

Topics:  

  • Business News
  • Mutual Fund

संबंधित बातम्या

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
1

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद
2

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी
3

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा
4

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.