Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात गुंतवणुकीची मोठी संधी! बंदर क्षेत्रात ७६ हजार कोटींचे करार; नितेश राणेंचे जागतिक गुंतवणूकदारांना आवाहन

Nitesh Rane on Maritime Port Development: महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात ७६ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले असून, जागतिक गुंतवणूकदारांना उद्योग उभारण्याचे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 02, 2026 | 06:40 PM
Nitesh Rane

Nitesh Rane

Follow Us
Follow Us:
  • बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स क्षेत्रात गुंतवणुकीची संधी
  • जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे खुले
  • नितेश राणेंचे मोठे आवाहन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील क्षमता जागतिक स्तरावर विस्तारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्याच्या बंदर व सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी उपलब्ध असून, जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज असून राज्यात गुंतवणूक करून उद्योग उभारावेत आणि जागतिक सागरी अर्थव्यवस्थेतील भारताच्या प्रगतीचे भागीदार व्हावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी फिक्कीच्या व्यासपीठावरून केले.

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्यावतीने ४थ्या मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपोचे आयोजन नेस्को, गोरेगाव येथे २ ते ४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. याचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाराष्ट्राच्या पोर्ट आणि मेरिटाइम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या विविध संधी, पायाभूत सुविधांचा विकास, तसेच या क्षेत्राच्या भविष्यातील योजनांबाबत त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष विजय शंकर, ध्रुव गौतम, कॅप्टन अबुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे गौरव दयाल, नेदरलॅंडचे जेरीवेल हेल्डन, शिपींग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनेश त्यागी, ओडिशा कॉमर्स आणि वाहतुक विभागाचे प्रधान सचिव एन बी एच राजपुत, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बी उपस्थित होते.

यावेळी मंत्री राणे म्हणाले, महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, नैसर्गिक बंदरे, मजबूत औद्योगिक पायाभूत सुविधा आणि निर्यातीसाठी उपलब्ध असलेली अनुकूल व्यवस्था यामुळे बंदर उद्योगासाठी महाराष्ट्र हे महत्वाचे केंद्र ठरू शकते. राज्यातील मेरिटाइम क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीला चालना देण्यात येत असून, या क्षेत्रात तब्बल ७६ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील संधींना चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘वन विंडो क्लिअरन्स’सारख्या सुविधांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या सागरी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देण्यासाठी मुंबई वॉटर मेट्रोसारख्या आधुनिक जलवाहतूक संकल्पनांवर भर देण्यात येत आहे. मुंबई वॉटर मेट्रो ही जगातील सर्वात मोठी जलवाहतूक बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंदरांची क्षमता वाढविणे, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार करणे तसेच निर्यातीला चालना देणे, या माध्यमातून महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या नैसर्गिक भौगोलिक सामर्थ्याला औद्योगिक क्षमता आणि आधुनिक पायाभूत सुविधांची जोड देऊन राज्याच्या बंदर आणि मेरिटाइम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात येत आहे. जागतिक गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रातील उपलब्ध संधींचा लाभ घेऊन बंदर व जहाज बांधणी, दुरुस्ती क्षेत्रात उद्योग उभारावेत, असे आवाहन त्यांनी केले.

अमृतकाळात भारताची सागरी क्षमता वाढविण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे केवळ उद्योगांचा विस्तार होणार नाही, तर राज्यात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील. महाराष्ट्राला देशातील आघाडीचे मेरिटाइम आणि सागरी व्यापाराचे केंद्र बनविण्याच्या दिशेने ही समिट निश्चितच महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

धनतेरसचा मुहूर्त साधा! Instamart वर सोन्याची नाणी आणि चांदीच्या नाण्याएवढा Voucher

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्राचे बंदरे मंत्री कोण आहेत?

    Ans: नितेश राणे हे महाराष्ट्राचे बंदरे मंत्री आहेत.

  • Que: महाराष्ट्रात किती कोटींचे गुंतवणूक करार झाले आहेत?

    Ans: महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात ७६ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले आहेत.

  • Que: मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्सचे आयोजन कुठे करण्यात आले?

    Ans: मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को येथे आयोजन करण्यात आले.

Web Title: Nitesh rane on global investors maharashtra maritime investment 76000 crore pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Business News
  • Maritime Action
  • MLA Nitesh Rane
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ
1

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ

धनतेरसचा मुहूर्त साधा! Instamart वर सोन्याची नाणी आणि चांदीच्या नाण्याएवढा Voucher
2

धनतेरसचा मुहूर्त साधा! Instamart वर सोन्याची नाणी आणि चांदीच्या नाण्याएवढा Voucher

Upcoming IPOs India: IPO बाजारात मोठी धमाका! OYO ते Razorpay, 10 कंपन्या गुंतवणूकदारांच्या भेटीला
3

Upcoming IPOs India: IPO बाजारात मोठी धमाका! OYO ते Razorpay, 10 कंपन्या गुंतवणूकदारांच्या भेटीला

India Manufacturing PMI: कारखान्यांचा वेग मंदावला! ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राला ब्रेक
4

India Manufacturing PMI: कारखान्यांचा वेग मंदावला! ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राला ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.