
ITR Refund Interest Rule
ITR Refund Interest Rule: करदात्यांची चिंतेत वाढ झाली आहे. इन्कम टॅक्स भरूनही जर रिफंड मिळण्यासाठी जर विलंब होत असेल तर तुम्हाला तुमचा परतावा लवकरच मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला वेळेवर रिटर्न भरावा लागेल. याउलट, तुम्ही आयटीआर उशिरा भरला असेल तुम्हाला व्याज मिळू शकणार नाही.
यावेळी, आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 14 सप्टेंबर होती पण नंतर ती 16 सप्टेंबरपर्यंत पुढे वाढवण्यात आली. तत्पूर्वी, ज्यांनी दोन महिन्यापूर्वी आयटीआर दाखल केला आहे. त्यांना अजूनपर्यंत इन्कम टॅक्स परतावा मिळालेला नाही. अनेक जणांनी वेळेवर संपूर्ण प्रकिया पूर्ण केली असूनही त्यांच्या बँक खात्यात परतावा जमा झालेला नाही.
दररोज परताव्याची स्थिती पाहण्यासाठी लाखो करदाते त्यांचे बँक अकाउंट आणि आयकर पोर्टल तपासात आहेत. मात्र, काहींना त्यांचे परतावे मिळाले आहेत तर काहींची परताव्या येण्याची प्रतीक्षा संपलेली नाही. कायद्यानुसार, परतावा मिळण्यास उशीर झाल्यावर खरचं व्याज जमा होतो का? समजून घेऊया सविस्तर..
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, चांदीचे दरही नरमले! जाणून घ्या सविस्तर
परतावा मिळत नसेल तर व्याज कधीपासून मिळते?
जर करदात्यांनी ITR 16 सप्टेंबरपूर्वी भरला असेल आणि तरीही तुमचा परतावा बँक खात्यात जमा झाला नसेल तर घाबरायची गरज नाही. आयकर विभाग जर परतावा उशीर झाला असेल तर तुमच्या बँक खात्यात त्या परताव्याचा व्याजही जमा करते. आयकर विभागाच्या नियमांनुसार 1 एप्रिलपासून बँक खात्यात करदात्याचे पैसे जमा होईपर्यंत व्याज मिळत जाईल.
आयकर कायद्यामध्ये 1961 च्या कलम 244A नुसार, जर परतावा जारी करण्यास कर विभाग विलंब करत असेल, तर 6% वार्षिक व्याज करदात्याच्या बँकेत जमा केला जातो. (दरमहा 0.5% किंवा काही भाग मिळवण्यासाठी पात्र असतात. तसेच, जोपर्यंत परतावा जारी होत नाही तोपर्यंत व्याज जमा होण्याची प्रकिया चालू राहते.
हेही वाचा : आयटीआर भरण्याआधी ‘हे’ वाचाच; ‘या’ 10 उत्पन्नावर नाही भरावा लागत कोणताही कर!
काही प्रकरणात आयकर विभागाची चूक नसून करदात्यांची चूक असते. तेव्हा, कर निर्धारण अधिकारी इन्कम टॅक्स रिटर्न भरताना अपूर्ण किंवा चुकीची माहिती आढल्यास अतिरिक्त तपशील मागण्यासाठी करदात्याला नोटीस पाठवू शकते. करदात्याने नोटीस वेळेवर उत्तर दिले नाही तर, व्याज मिळणार नाही. म्हणजेच, त्रुटी सुधारण्यासाठी करदात्याला लागणारा वेळ व्याज मिळण्याच्या वेळेतून वगळला जाईल.