Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगाची अर्थव्यवस्था 35 टक्क्यांनी, भारताची अर्थव्यवस्था 90 टक्क्यांनी वाढतीये – पंतप्रधान मोदी

भारताच्या कामगिरी आता जागतिक स्तरावर झळकत आहे. गेल्या दशकात 25 कोटींहून अधिक लोकांना सरकारने गरिबीतून बाहेर काढले आहे. ज्यामुळे नवीन मध्यमवर्गाचा उदय झाला आहे. भाजप सरकारने गरिबांच्या सक्षमीकरणाचा मार्ग निवडल्यामुळे लोकांच्या जीवनमानात खूप बदल झाला आहे.' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 31, 2024 | 09:33 PM
जगाची अर्थव्यवस्था 35 टक्क्यांनी, भारताची अर्थव्यवस्था 90 टक्क्यांनी वाढतीये - पंतप्रधान मोदी

जगाची अर्थव्यवस्था 35 टक्क्यांनी, भारताची अर्थव्यवस्था 90 टक्क्यांनी वाढतीये - पंतप्रधान मोदी

Follow Us
Close
Follow Us:

देशात गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. या काळात जगाची अर्थव्यवस्था ३५ टक्क्यांनी वाढली असताना, देशाची अर्थव्यवस्था ९० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या दशकात भारताने गरिबी कमी करण्यात अभूतपूर्व यश मिळविले आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका माध्यम समुहाच्या कार्यक्रमामध्ये म्हटले आहे. यावेळी त्यांंनी भारताची आर्थिक प्रगती, गरिबी निर्मूलन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रकाश टाकला. तसेच गेल्या दशकात भारताने केलेली प्रगती आणि लोकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल सांगितले आहे.

विकासाच्या आश्वासनाचा परिणाम

गेल्या 10 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था 90 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. हे भाजप सरकारने दिलेल्या विकासाच्या आश्वासनाचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर हा भविष्यातही कायम राहील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. हा विकास केवळ आश्वासने नसून, भविष्यातही कायम राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहे.

हेही वाचा – तब्बल 47,500 कोटी संपत्तीची मालकीन, वाचा… कोण आहे ही भारतातील सर्वात श्रीमंत महिला!

 

Speaking at the @EconomicTimes World Leaders Forum. #ETWLF https://t.co/D6UEyl46Ps — Narendra Modi (@narendramodi) August 31, 2024

रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा सरकारच्या कामाचा मंत्र

रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा मंत्र केंद्रातील सरकारच्या कामकाजाचा आधार आहे. या मंत्रांद्वारे सरकारकडून देशात अनेक महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे भारतीयांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. देशवासियांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या सुधारणांमुळे देशातील जीवनमान सुधारले आहे आणि प्रगतीला चालना मिळाली आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहे.

हेही वाचा – 20 व्या वर्षी बनला कोट्यवधींचा मालक, अल्पावधीत सर्व गमावले; घेतली पुन्हा फिनिक्स भरारी, प्रसिद्ध बिझनेसमनने सांगितली आपबीती

तरुण, महिलांचा सरकारला पाठिंबा

गेल्या दशकातील देशाच्या कामगिरीचा विचार करता भारतीयांचा आत्मविश्वास वाढला आहे. हा आत्मविश्वास भारताच्या विकास आणि नवीन सुधारणांसाठी महत्वपुर्ण ठरत आहे. अनेक देशांमध्ये सरकारांना आव्हानांचा सामना करावा लागत असताना, भारतातील परिस्थिती वेगळी आहे. भारतातील तरुण आणि महिलांनी सातत्य आणि देशातील राजकीय स्थिरतेसाठी मतदान केले आहे. जे सरकारच्या प्रगती आणि स्थिर सरकारला पाठिंबा दर्शवत आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Web Title: World economy grows by 35 percent indias economy by 90 percent prime minister modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 09:33 PM

Topics:  

  • Indian Economy
  • Naredra Modi
  • prime minister

संबंधित बातम्या

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
1

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.