Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस भरती दरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; वाचा… कुठे घडलीये घटना!

नवी मुंबई कॅम्पच्या सशस्र पोलिस शिपाई भरतीसाठी आलेल्या एका २५ तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी (ता.२९) मैदानी चाचणी दरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 30, 2024 | 08:05 PM
पोलीस भरती दरम्यान २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; वाचा... कुठे घडलीये घटना!

पोलीस भरती दरम्यान २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; वाचा... कुठे घडलीये घटना!

Follow Us
Close
Follow Us:

पोलीस भरती म्हटले तरुणांना क्रेझ असते ती पोलिसांच्या वर्दीची. ज्यासाठी अनेक तरुण आपले स्वप्न उराशी बाळगून जिल्ह्यांच्या ठिकाणी मैदानी चाचणी देण्यासाठी येत असतात. सध्या राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची शारीरिक चाचणी घेतली जात आहे. अशातच आता नवी मुंबई येथे पोलीस भरतीसाठी आलेल्या सात जणांची मैदानी चाचणी घेताना प्रकृती खालावली होती. त्यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर अन सहा पैकी आणखी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

रुग्नालयात जाण्याआधीच मृत्यू

अक्षय बिहाडे (वय 25) असे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय हा जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील रहिवाशी असून, त्याने राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 11, नवी मुंबई कॅम्पच्या सशस्र पोलिस शिपाई भरतीसाठी अर्ज केलेला होता. मात्र, शनिवारी (ता.२९) बाळेगाव, वाकळण येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये मैदानी चाचणी सुरु असताना सात तरुणांना चक्कर आले. ज्यामुळे त्यांना सर्वांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यातील अक्षय या तरुणाचा रुग्नालयात जाण्याआधीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अक्षय बिहाडे या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता त्याने मैदानी चाचणी दरम्यान काही घटकांचे सेवन केले होते. याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळे आता पोस्टमोर्टम रीपोर्टनंतरच अक्षयच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. पोलीस भरतीत यशस्वी होऊन कुटुंबाला हातभार लावावा, असे अक्षयचे स्वप्न होते. मात्र, आता त्याच्या मृत्युमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Web Title: 25 year old dies during police recruitment one is in critical condition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 08:02 PM

Topics:  

  • Police Recruitment

संबंधित बातम्या

दिल्ली पोलिस काॅन्स्टेबल पदासाठी भरती! 7,565 पदांसाठी करता येणार अर्ज
1

दिल्ली पोलिस काॅन्स्टेबल पदासाठी भरती! 7,565 पदांसाठी करता येणार अर्ज

शासनाकडून दिलासा! पोलीस होण्याचा आहे मनसुबा? ‘या’ उमेदवारांना देण्यात आली मुभा
2

शासनाकडून दिलासा! पोलीस होण्याचा आहे मनसुबा? ‘या’ उमेदवारांना देण्यात आली मुभा

Police Bharti Maharashtra 2025: पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १४ हजार पदांची मेगा भरती, आज होणार निर्णय
3

Police Bharti Maharashtra 2025: पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १४ हजार पदांची मेगा भरती, आज होणार निर्णय

पोलीस सेवेत रुजू होण्याचे स्वप्न आहे? RPSC च्या या भरतीमध्ये व्हा सहभागी!
4

पोलीस सेवेत रुजू होण्याचे स्वप्न आहे? RPSC च्या या भरतीमध्ये व्हा सहभागी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.