Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्य विभागात भरती! नाशिक महानगरपालिकेत ३०९ पदे रिक्त; त्वरित करा अर्ज

मराठी मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये ३०९ पदे रिक्त आहेत. तरुणांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी लेख संपूर्ण वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 25, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Mediaफोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Mediaफोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, एकूण ३०९ रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात आले होते. या संदर्भातील जाहिरात महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी एकूण ३,०३९ अर्ज प्राप्त झाले असून त्यामुळे भरती प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तरुणांनो! लक्ष द्या! करिअर आणि आर्थिक व्यवस्थापनात चुकताय? तर नक्की वाचा

या भरतीमध्ये ‘एएनएम’ पदासाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले असून, ५३ जागांसाठी तब्बल १,०४३ अर्ज आले आहेत. यानंतर स्टाफ नर्सच्या ६७ पदांसाठी ८१६ उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, बालरोगतज्ज्ञ आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या महत्त्वाच्या पदांसाठी एकाही उमेदवाराने अर्ज न केल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय विभागाकडून प्राप्त अर्जांची तपासणी सुरू असून, पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी लवकरच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य सेवा सुधारण्यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या पदांची ही भरती केली जात आहे. ही पदभरती मुख्यतः महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रे व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रिक्त असलेल्या जागांकरिता राबवण्यात येत आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे.

परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी

प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एमबीबीएस आणि तज्ज्ञ पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार असून, त्यानंतर निवड करण्यात येईल. इतर पदांसाठी उमेदवारांची निवड मेरिट सूची आणि बिंदुनामावलीच्या आधारे करण्यात येणार असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी सांगितले. ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे अपडेट्स पाहावेत, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Web Title: 309 posts vacant in nashik municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • Government Job
  • Nashik

संबंधित बातम्या

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर
1

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
2

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!
3

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!
4

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.