Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ServiceNow संशोधन: AI मुळे लाखो रोजगारांची निर्मिती होणार, टेकमधील ‘या’ पदांसाठी भविष्यात असंख्य संधी

ServiceNow च्या संशोधनानुसार AI मुळे लाखो रोजगारांची निर्मिती होणार असून टेकमध्ये काही पदांसाठी भविष्यात असंख्य संधी उपलब्ध आहेत. जाणून घेऊया या पदांविषयी.

  • By नारायण परब
Updated On: Nov 18, 2024 | 04:49 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

व्‍यवसाय परिवर्तनासाठी एआय प्‍लॅटफॉर्म सर्विसनाऊने केलेल्‍या नवीन संशोधनाच्‍या मते, उदयोन्‍मुख तंत्रज्ञान भारतातील प्रमुख विकास क्षेत्रांमधील टॅलेंटमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणेल, तसेच २०२८ पर्यंत २.७३ दशलक्ष नवीन टेक रोजगार निर्माण होतील. जगातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या प्रमुख अर्थव्‍यवस्‍थांपैकी एक भारत देश आपल्‍या कर्मचाऱ्यांची संख्‍या २०२३ मधील ४२३.७३ दशलक्षवरून २०२८ पर्यंत ४५७.६२ दशलक्षपर्यंत वाढवण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे, ज्‍यामध्‍ये ३३.८९ दशलक्ष कर्मचाऱ्यांची भर होण्‍याचे दिसून येत आहे.

६.९६ दशलक्ष कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता

जगातील आघाडीची लर्निंग कंपनी पीअरसनने केलेल्‍या संशोधनामधून निदर्शनास येते की, रिटेल क्षेत्र रोजगार वाढीचे नेतृत्‍व करण्‍यास सज्‍ज आहे, जेथे त्‍यांच्‍या विस्‍तारीकरणासाठी अतिरिक्‍त ६.९६ दशलक्ष कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. ही वाढ रिटेल व्‍यावसायिकांना सॉफ्टवेअर  अ‍ॅप्‍लीकेशन डेव्‍हलपमेंट आणि डेटा इंजिनीअरिंग अशा क्षेत्रांमध्‍ये अपस्किल करण्‍याची बहुमूल्‍य संधी देते, तसेच त्‍यांना टेक-संचालित लँडस्‍केपसाठी सुसज्‍ज करते. यानंतर उत्‍पादन (१.५० दशलक्ष रोजगार), शिक्षण (०.८४ दशलक्ष रोजगार) आणि आरोग्‍यसेवा (०.८० दलशक्ष रोजगार) यांचा क्रमांक येतो, ज्‍यांना अपेक्षित आर्थिक वाढ आणि टेक परिवर्तनाचे पाठबळ मिळाले आहे.

टेकमधील नोकरीच्या संधीत होत आहे कमालीची वाढ 

उद्योगांमध्‍ये टेक-संबंधित रोजगार वाढत आहे, जेथे क्षेत्रांमधील प्रोफेशनल, सायण्टिफिक व टेक्निकल सर्विसेस, मॅन्‍युफॅक्‍चुरिंग आणि टेलिकम्‍युनिकेशन्‍स विस्‍तारीकरणासाठी सज्‍ज आहेत. या ट्रेण्‍डमध्‍ये अग्रस्थानी आहे सॉफ्टवेअर  अ‍ॅप्‍लीकेशन डेव्‍हलपर्स, जेथे १०९,७०० पदांची वाढ होण्‍याची अपेक्षा आहे. इतर उल्लेखनीय पदांमध्‍ये सिस्‍टम्‍स सॉफ्टवेअर डेव्‍हलपर्स (४८,८०० नवीन रोजगार) आणि डेटा इंजिनीअर्स (४८,५०० नवीन रोजगार) यांचा समावेश आहे. वेब डेव्‍हलपर्स, डेटा अ‍ॅनालिस्‍ट्स आणि सॉफ्टवेअर टेस्‍टर्स यांची अनुक्रमे ४८,५००, ४७,८०० व ४५,००० पदांच्‍या अपेक्षित  मागणी वाढली आहे. तसेच, डेटा इंटीग्रेशन स्‍पेशालिस्‍ट्स, डेटाबेस आर्किटेक्‍ट्स, डेटा सायण्टिस्‍ट्स आणि कम्‍प्‍युटर अँड इम्‍फर्मेशन सिस्‍टम्‍स मॅनेजर्स अशा पदांमध्‍ये ४२,७०० ते ४३,३०० पदांपर्यंत वाढ दिसण्‍याची अपेक्षा आहे. ऊर्जा, सरकारी सेवा व युटिलिटीज अशा उद्योगांमध्‍ये देखील उदयोन्‍मुख तंत्रज्ञानाचा प्रभाव दिसून येईल, ज्‍यामुळे तंत्रज्ञान-संचालित सुधारणांदरम्‍यान कर्मचारीवर्गामध्‍ये वाढ होण्‍याला गती मिळेल.

 ‘राइजअप विथ सर्व्हिसनाऊ’

या गतीशी संलग्‍न राहण्‍यासाठी कंपन्‍या आणि धोरणकर्त्‍यांनी एकत्रित प्रयत्‍न करत कर्मचाऱ्यांना अपस्किल केले पाहिजे आणि तंत्रज्ञान-सक्षम कर्मचारीवर्ग घडवण्‍याची खात्री घेतली पाहिजे. ‘राइजअप विथ सर्विसनाऊ’ प्रोग्राम जागतिक उपक्रम आहे, जो तरूण इंजीनिअर्सना व्‍यावहारिक, रोजगार-सुसज्‍ज कौशल्‍यांसह सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. या उपक्रमाचा २०२४ पर्यंत जगभरातील उच्‍च मागणी असलेल्‍या डिजिटल क्षमतांमध्‍ये एक लाख व्‍यक्‍तींना प्रशिक्षण देण्‍याचा मनसुबा आहे. ९७,६९५ भारतीयांनी गेल्‍या १२ महिन्‍यांमध्‍ये कंपनीच्‍या एआय प्‍लॅटफॉर्मवर कौशल्‍ये अवगत केली आहेत. सर्विसनाऊने १६ राज्‍यांमधील २० युनिव्‍हर्सिटीजसोबत सहयोग करत, तसेच सरकारी संस्‍था फ्यूचरस्किल्‍स प्राइम बाय नॅसकॉम आणि एआयसीटीई यांच्‍यासोबत भागीदारी करत आपला युनिव्‍हर्सिटी अकॅडेमिक प्रोग्राम देखील लाँच केला आहे. या प्रयत्‍नांच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी हजारो विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षित केले आहे, तसेच टेक उद्योगासाठी रोजगार-सुसज्‍ज टॅलेंटची पाइपलाइन तयार करत आहे.

 

Web Title: According to servicenow research ai will create millions of jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 04:49 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड
1

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड

जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश
2

जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक
3

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक
4

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.