Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग

Artificial Intelligence in Engineering Future Career in AI : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक नियमित कामे अधिक वेगाने आणि अचूकपणे होणार असली, तरी अभियंत्यांची गरज संपणार नसून त्यांच्या कामाचे स्वरूप बदलणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 15, 2026 | 08:09 PM
Artificial Intelligence in Engineering

Artificial Intelligence in Engineering

Follow Us
Follow Us:
  • पारंपरिक अभियांत्रिकीला एआयची जोड
  • विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासोबत मूलभूत कौशल्यांवरही द्यावा भर
  • कृत्रिम बुद्धिमत्ता माझे काम अधिक सक्षम करणारे साधन
सोनाजी गाढवे/पुणे: कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर पाहता भविष्यात अभियंत्यांची भूमिका संपणार की बदलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, एआय हे स्वतंत्र अभियांत्रिकी क्षेत्र नसून अभियंत्यांच्या कामाला अधिक स्मार्ट आणि परिणामकारक बनविणारे तंत्रज्ञानाचे साधन आहे. त्यामुळे एआयमुळे अभियंत्यांची गरज कमी होण्याऐवजी त्यांच्या कामाचे स्वरूप बदलणार असल्याचे प्रा. डॉ. गणेश काकांडीकर यांनी सांगितले.

Inspiring Story: ‘काकांच्या एका आयडियाने बदललं आयुष्य’; पायाने लिहून विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाची कथा एकदा वाचाच

अभियांत्रिकी मध्ये रचना तयार करणे, गणिती विश्लेषण, संगणकीय आज्ञावली लिहिणे, नमुने तयार करणे, यंत्रांची तपासणी, माहितीचे विश्लेषण आणि उत्पादन प्रक्रियेचे नियंत्रण यांसारखी अनेक कामे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अधिक जलद आणि अचूकपणे करता येत आहेत. त्यामुळे पुनरावृत्तीची आणि नियमित स्वरूपाची काही कामे स्वयंचलित होतील. मात्र, त्याच बरोबर बदलत्या ग्राहकांच्या गरजा हे सध्याच्या अभियंत्यांसमोरील मोठे आव्हान आहे. ग्राहकांच्या आवडी-निवडी वेगाने बदलत आहेत. जागतिकीकरणामुळे बाजारपेठेतील स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे अभियंत्यांना तांत्रिक ज्ञानासोबत ग्राहकांच्या गरजा, बाजारपेठ आणि बदलते तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता माझा स्पर्धक आहे,’ असा विचार करण्याऐवजी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता माझे काम अधिक सक्षम करणारे साधन आहे,’ असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या विषयातील सखोल ज्ञानासोबत नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर शिकणे, प्रकल्पाधारित शिक्षण घेणे आणि सतत नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रा. उद्धव शिद यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी काय शिकावे?

भविष्यातील अभियंत्यांनी पारंपरिक अभियांत्रिकीचे मूलभूत ज्ञान मजबूत करण्यासोबत एआय, डेटा विश्लेषण, स्वयंचलन (ऑटोमेशन) आणि डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करावे. तंत्रज्ञान बदलत असले तरी समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याचे कौशल्य महत्त्वाचे राहणार आहे, असे गणेश काकांडीकर यांनी सांगितले.

अभियांत्रिकी प्राध्यापक, प्रा. डॉ. गणेश काकांडीकर म्हणाले की, “एआयमुळे अभियांत्रिकीची मूलभूत गरज संपणार नाही. वस्तू, घरे, यंत्रणा आणि विविध उत्पादनांची निर्मिती करण्याचे काम अभियंत्यांचेच राहणार आहे. मात्र, एआयचा प्रभावी वापर करणारे अभियंते अधिक चांगली, स्मार्ट आणि मानवी गरजा लक्षात घेणारी उत्पादने तयार करू शकतील.”

पुणे, झील एज्युकेशन सोसायटीचे संचालक, प्रा. उद्धव शिंदे, म्हणाले की, “भविष्यात यशस्वी होणारा अभियंता तोच असेल, जो केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणार नाही, तर तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन समस्या सोडवून समाजासाठी आणि उद्योगासाठी मूल्य निर्माण करेल. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता मुळे अभियंत्यांची भूमिका संपणार नसून ती अधिक सर्जनशील, निर्णयक्षम आणि नवोन्मेषी होणार आहे.”

IPS Bushra Bano Controversy: ‘अस्सलामु अलैकुम’ बोलल्यामुळे IPS बुशरा बानो अडचणीत? गृह सचिवांकडे तक्रार दाखल

Web Title: Ai engineering jobs future career engineers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Career
  • education
  • Engineering

संबंधित बातम्या

Inspiring Story: ‘काकांच्या एका आयडियाने बदललं आयुष्य’; पायाने लिहून विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाची कथा एकदा वाचाच
1

Inspiring Story: ‘काकांच्या एका आयडियाने बदललं आयुष्य’; पायाने लिहून विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाची कथा एकदा वाचाच

एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; CAT 2026 ची अर्ज प्रक्रिया आज संपणार!
2

एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; CAT 2026 ची अर्ज प्रक्रिया आज संपणार!

NTA Office Shifted: नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे कार्यालय नव्या पत्त्यावर! विद्यार्थ्यांसाठी NTA ने जारी केला डिटेल्स
3

NTA Office Shifted: नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे कार्यालय नव्या पत्त्यावर! विद्यार्थ्यांसाठी NTA ने जारी केला डिटेल्स

AI Risks : ‘येत्या 5 वर्षांत एआय मानवांसाठी ठरेल अत्यंत घातक…’; गुगलच्या वरिष्ठ संशोधकाचा गंभीर इशारा देऊन राजीनामा
4

AI Risks : ‘येत्या 5 वर्षांत एआय मानवांसाठी ठरेल अत्यंत घातक…’; गुगलच्या वरिष्ठ संशोधकाचा गंभीर इशारा देऊन राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.