फोटो सौजन्य- iStock
एआय (AI) आर्टिफिशल इंटिलिजेंस ने आज असंख्य क्षेत्रामध्ये खळबळ निर्माण केली आहे. एआय मुळे अनेक नोकऱ्यांवर परिणाम होत आहेच आणि भविष्यामध्येही असंख्य नोकऱ्या एआयमुळे जाणार आहेत. त्यामुळे आज प्रत्येक जणच आपल्या नोकरीबद्दल असुरक्षित वाटून घेत आहे. आयटी क्षेत्रात सर्वात जास्त एआयचा वापर केला जात आहे. त्यानंतर मीडियापासून ते उत्पादननिर्मिती क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रात एआयचा वापर वाढू लागला आहे. एआयमुळे नोकरीच्या क्षेत्रात प्रचंड बदल होत आहेतच मात्र जर नोकरी करताना आपण तंत्रज्ञानासंबंधी योग्य अपडेट राहिलात तर नोकरी राखूच मात्र नवनवीन संधी ही मिळू शकते. यासाठी अनेक शॉर्ट टर्म ऑनलाईन कॉर्सही उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी भारतातील प्रतिष्ठित विद्यापिठांमध्येही काही कालावधीपूर्वीच एआय, मशिन लर्निंगमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु केला गेला आहे. मात्र काही असे क्षेत्र आहेत या क्षेत्रातील नोकरीवर एआयचा प्रभाव पडणार नाही. जाणून घेऊया अशा क्षेत्रांबद्दल आणि नोकऱ्यांबद्दल
शैक्षणिक क्षेत्र
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या शिक्षणाच्या भविष्याच्या अहवालानुसार, एआयने अध्यापनाला पूरक असणे आवश्यक आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे शिक्षक हा माहिती देण्यापलीकडे असतो. ते विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करतात. एआयमुळे शिक्षण क्षेत्रात बदल घडू शकतो मात्र शिक्षक हा विद्यार्थ्यांना त्यांच्यातील क्षमता सुधारण्यासाठी मदत करतो.
सर्जनशील क्षेत्र
सर्जनशीलता असलेल्या क्षेत्रात एआयचा परिणाम होऊ शकत नाही असे तज्ञांचे मत आहे. जसे की संगीतकार, लेखक, पत्रकार, संवाद लेखक यांचा समावेश होतो.
वैद्यकीय क्षेत्र
वैद्यकीय क्षेत्रात एआयमुळे फायदा होणार आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येणार नाही. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ इत्यांदीचा समावेश आहे. वैद्यकीय सेवा देताना डॉक्टरांकडून दिले जाणारे पाठबळ आणि भावनिक समर्थन याची जाग एआय घेऊ शकत नाही. आरोग्यासंबंधी बांबीसाठी मानवी संवाद ही खूप महत्वाचा ठरतो.
कुशल व्यवसाय क्षेत्र
इलेक्ट्रिशिय, कारागीर, प्लंबर यांसारखे कुशल व्यवसाय एआयद्वारे त्वरीत बदलणे अत्यंत आव्हानात्मक आहे. यामध्ये परिस्थिती, मानवी निपुणता आणि समस्या सोडविण्याची क्षमता अत्यंत महत्वाची ठरते.
अन्य क्षेत्र
यामध्ये कला क्षेत्राचा समावेश होतो सर्वच कला प्रकारात सर्जंनशीलतेसोबतच गुणवत्ता, शैली महत्वाची असते तसेच हॉटेल उद्योगाचाही विचार केल्यास तिथे एआय सहाय्यभूत असेल मात्र शेफसारखे चविष्ट खाद्यपदार्थ बनविणे शक्य होणार नाही.