फोटो सौजन्य - Social Media
गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (GRSE)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेनीच्या पदासाठी उमेदवारांना नियुक्त केले जाणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या लोकांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. ऑक्टोबरच्या १९ तारखेपासून या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना १७ नोव्हेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र असणे अनिवार्य आहे. चला तर मग जाणून घेऊयात, या भरतीच्या प्रक्रियेबद्दल.
हे देखील वाचा : नेव्हल रॅपर शिप यार्डमध्ये भरतीची संधी; २१० रिक्त जागांसाठी करता येणार अर्ज
GRSE च्या या भरतीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून २३६ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही शिल्लक पदे विविध विभागातील आहेत. त्या विभागाच्या नुसार उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही शैक्षणिक अटी तसेच वयासबंधित असणाऱ्या अटींना पात्र करणे आवश्यक असणार आहे. या भरतीच्या संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी तसेच या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी GRSE च्या www.grse.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.
GRSE ने आयोजित केल्या या भरतीच्या माध्यमातून ट्रेड अप्रेंटिस पदासाठी असलेले ९० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर याच पदासाठी आणखीन ४० फ्रेशर उमेदवारांना नियुक्त केले जाणार आहे. या रिक्त जागेत ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ४० पदे, HR ट्रेनीसाठी ६ पदे आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी ६० रिक्त पदांचा समावेश आहे. मेरिटच्या साहाय्याने उमेदवारांची नियुक्ती केली जाणार. नियुक्तीनंतर उमेदवारांना दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी बोलावले जाईल.
हे देखील वाचा : India Post GDS तिसरी मेरिट लिस्ट झाली जाहीर; अशा प्रकारे येईल पाहता
GRSE च्या ‘या’ भरतीमध्ये अशा प्रकारे करता येईल अर्ज:
या भरती संदभात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. अर्ज करण्याअगोदर अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी मग नंतरच अर्ज भरण्यास घ्यावे असा सल्ला आहे.