Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दिल में ना रखिए डर, ‘या’ क्षेत्रात करा करिअर’ AI पण तुमच्या नोकरीला लावू शकणार नाही हात

AI च्या युगात अनेक नोकऱ्यांवर संकट असले तरी काही करिअर क्षेत्रं, जसं की सायबर सिक्युरिटी, हेल्थ मॅनेजमेंट, ब्रँड स्ट्रॅटेजी, सेल्स इंजिनिअरिंग आणि नेटवर्क आर्किटेक्चर, आजही सुरक्षित मानली जातात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 09, 2025 | 08:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे अनेक पारंपरिक नोकर्या धोक्यात आल्या आहेत, विशेषतः एंट्री-लेव्हल वाइट कॉलर जॉब्स. काही अंदाजांनुसार पुढील ५ वर्षांत अशा नोकर्यांपैकी बराच मोठा भाग ऑटोमेशनमुळे नष्ट होऊ शकतो. मात्र घाबरण्याचं कारण नाही, कारण अजूनही काही क्षेत्रं अशी आहेत जी AI च्या प्रभावापासून सुरक्षित आहेत. या क्षेत्रांना “न्यू कॉलर जॉब्स” असं म्हटलं जातं आणि यामध्ये कमाईही मोठी ८० लाखांपर्यंत होऊ शकते.

RCFL मध्ये 74 पदांसाठी भरती सुरू; ‘या’ पदांसाठी करता येईल अर्ज

चला जाणून घेऊया अशी ५ क्षेत्रं, जिथे AI सुद्धा नोकरी घेऊ शकणार नाही:

इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अ‍ॅनालिस्ट

डिजिटल युगात सायबर हल्ले, डेटा चोरी यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी कंपन्यांना सिक्युरिटी अ‍ॅनालिस्ट लागतात. हे तज्ज्ञ सिस्टममध्ये कमतरता शोधून ती दुरुस्त करतात. AI फक्त सहाय्यक ठरतो, पण रिअल-टाइम निर्णय घेणं मानवांचंच काम आहे.

हेल्थ सर्व्हिस मॅनेजर

रुग्णालय चालवताना डॉक्टरांइतकंच महत्व व्यवस्थापन टीमचं असतं. बजेट, नियम, स्टाफ मॅनेजमेंट हे सगळं मॅनेजर करत असतो. यात मानवसंपर्क, समजूत आणि अनुभव फार महत्वाचे आहेत, जे AI करू शकत नाही.

ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट / मार्केटिंग लीडर

ब्रँड फक्त डेटा किंवा ट्रेंडवर तयार होत नाही. त्यासाठी इमोशन, स्टोरीटेलिंग, टीम लीडिंग आणि क्रिएटिव व्हिजन आवश्यक आहे. AI विश्लेषण करू शकतो, पण ब्रँडसाठी हृदयापासून विचार करणं त्याच्या आवाक्याबाहेर आहे.

BHEL मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ तारखेपासून करता येईल अर्ज 

सेल्स इंजिनिअर

तांत्रिक उत्पादनांची माहिती घेऊन ती ग्राहकाला समजावून सांगणं हे सेल्स इंजिनिअरचं प्रमुख काम. ग्राहकाच्या गरजेनुसार सोल्युशन देणं, संवाद साधणं, नातं निर्माण करणं – हे सगळं AI करत नाही.

नेटवर्क आर्किटेक्ट / IT प्लॅनर

क्लाउड, डेटा ट्रॅफिक, नेटवर्क डिझाइन यासाठी कल्पकता, दूरदृष्टी आणि योजना करण्याची क्षमता लागते. AI ऑप्टिमायझेशन करू शकतो, पण सुरवातीची योजना, ट्रबलशूटिंग आणि मोठी प्लॅनिंग ही माणसांची गरजच राहणार.

Web Title: Ai wont be able to kill these jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 08:31 PM

Topics:  

  • ai
  • AI technology

संबंधित बातम्या

“मी गोरा तर मुलं सावळी कशी?” जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली; Video Viral
1

“मी गोरा तर मुलं सावळी कशी?” जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली; Video Viral

Jiohotstar वरील ‘AI महाभारत’ला चूक पडली महागात, आधुनिक टचमुळे चाहत्यांचा संताप
2

Jiohotstar वरील ‘AI महाभारत’ला चूक पडली महागात, आधुनिक टचमुळे चाहत्यांचा संताप

सर्व शाळांत तिसरीपासून ‘एआय’! एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
3

सर्व शाळांत तिसरीपासून ‘एआय’! एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण

अदानी एअरपोर्टसने एजेंटिक एआय सोल्‍यूशन्‍ससाठी एआयओएनओएससोबत धोरणात्‍मक करार 
4

अदानी एअरपोर्टसने एजेंटिक एआय सोल्‍यूशन्‍ससाठी एआयओएनओएससोबत धोरणात्‍मक करार 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.