
ram mandir ceo
Ram Mandir CEO : भारतीय हवाई दलाचे माजी अधिकारी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची राम मंदिरच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र मिश्रा यांची मंदिराचे पहिले पूर्णवेळ सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे. भारतीय हवाई दलात सुमारे ४ दशके सेवा दिलेले जितेंद्र मिश्रा त्यांच्या दीर्घ लष्करी अनुभवासाठी आणि विविध महत्त्वाच्या पदांवर काम करण्यासाठी ओळखले जातात. ते वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ देखील राहिले असून ३० एप्रिल २०२६ रोजी भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले होते.
राम मंदिरचे सीईओ म्हणून आता त्यांच्यासमोर मंदिराची प्रशासकीय व्यवस्था आणि वेगवेगळ्या स्तरांवर काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी असेल. ५,५८५ अर्जांमधून शॉर्टलिस्ट केलेल्या तीन उमेदवारांमधून जितेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. अशा स्थितीत एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांचे शिक्षण किती झाले आहे आणि त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे, याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहेत.
जितेंद्र मिश्रा हे भारतीय हवाई दलाच्या फायटर स्ट्रीमशी संबंधित अधिकारी आहेत. त्यांनी नॅशनल डिफेन्स अकादमी, पुणे येथून प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये ६९ व्या एनडीए कोर्सचा उल्लेख आहे, ज्यामध्ये त्यांनी डिसेंबर १९८५ पासून कॅडेट म्हणून प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलात विविध विशेष प्रशिक्षण आणि कोर्सेस देखील पूर्ण केले. ते एअर फोर्स टेस्ट पायलट स्कूल, बंगळुरूशी संबंधित होते आणि टेस्ट पायलट म्हणूनही त्यांनी सेवा दिली. याशिवाय, ते एअर कमांड अँड स्टाफ कॉलेज, यूएसएचे माजी विद्यार्थी देखील आहेत. त्यांच्या व्यावसायिक पार्श्वभूमीत रॉयल कॉलेज ऑफ डिफेंस स्टडीज, यूकेशी संबंधित प्रशिक्षणाचाही समावेश आहे.
जितेंद्र मिश्रा यांना ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलाच्या फ्लाईंग ब्रँचमध्ये पायलट म्हणून कमिशन मिळाले. त्यांचा सर्व्हिस नंबर १८५७५ एफ (पी) असा होता आणि ते फायटर स्ट्रीमशी संबंधित होते. हवाई दलातील जवळपास ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या पदोन्नतीचा प्रवासही खूप मोठा होता. ते ६ डिसेंबर १९९१ रोजी फ्लाईट लेफ्टनंट, ५ मे २००३ रोजी विंग कमांडर, २ मार्च २००९ रोजी ग्रुप कॅप्टन आणि १७ जून २०१३ रोजी एअर कमोडोर झाले. यानंतर १ जुलै २०१९ रोजी एअर व्हाईस मार्शल आणि १ जानेवारी २०२३ रोजी एअर मार्शल पदावर त्यांची पदोन्नती झाली.
जितेंद्र मिश्रा यांनी १ जानेवारी २०२५ रोजी कमांडर-इन-चीफ म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर ते भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बनले. हवाई दलातील हे त्यांच्या शेवटच्या वरिष्ठ पदांपैकी एक होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ते वेस्टर्न एअर कमांडचे नेतृत्व करत होते. यानंतर ३० एप्रिल २०२६ रोजी निवृत्त झाल्यानंतर आता त्यांना राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या सीईओची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
UPSC Mains Result : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या संभाव्य तारीख
राम मंदिरच्या सीईओ पदाच्या अर्ज प्रक्रियेदरम्यानच हे स्पष्ट करण्यात आले होते की, निवड झालेल्या अधिकाऱ्याचा पगार आणि भत्ते परस्पर संमतीने ठरवले जातील. ही नियुक्ती ३ वर्षांच्या करारावर असेल आणि अधिकाऱ्याला अयोध्येत राहावे लागेल. याशिवाय, राम मंदिर ट्रस्टनुसार सीईओला सरकारी वाहन, निवास, सुरक्षा व्यवस्था आणि इतर सुविधा राम मंदिर ट्रस्टच्या निधीतून दिल्या जातील.