
airplane
Aircraft Fuel Tank Design: कधी आकाशात उडणारं विमान पाहिले आहे का? किती प्रचंड आणि वजनदार असतं. पण त्याचे पंख एकदम पातळ! तरीही हे पंख संपूर्ण विमानाचे वजन हवेत कसं पेलत असतील ? याहूनही रंजक गोष्ट म्हणजे पातळ पंखांच्या आत कशाप्रकारे हजारो लीटर विमानाचे इंधन भरलेले असते? चला तर मग जाणून घेऊया यामागचे रंजक विज्ञान …
जेव्हा आपण विमानाचे पंख दुरून किंवा जवळून पाहतो. तेव्हा ते आपल्याला सपाट आणि भरीव वाटतात. पण हा आपल्या डोळ्याचा भास असतो. प्रत्यक्षात हे पंख आतून पूर्णपणे पोकळ असतात. विमान तयार करणारे इंजिनिअर्स हे विमानाची रचना अशाप्रकारे करतात. ज्यामुळे हे पंख विमानाला सहजरित्या हवेत उचलतात. तसेच यांचा वापर इंधन साठवण्याची टाकी म्हणून होतो.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पंखांच्या आत नक्की काय असते? पंखांच्या आतील रचना अत्यंत मजबूत आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यांच्या आत धातूचे मजबूत सांगाडे असतात.
स्पार (Spar): पंखांच्या आत दोन-तीन लांब आणि अत्यंत मजबूत पट्ट्या असतात. ज्यांना ‘स्पार’ म्हणतात. ह्या विमानांच्या पंखांचा एक प्रकारे ‘पाठीचा कणा’ असतात. हे स्पारच मुख्य ताकद देतात आणि संपूर्ण विमानाचे वजन पेलतात.
रिब (Rib): या स्पार्सच्या दरम्यान छोट्या छोट्या बरगड्यांसारख्या रचना असतात, ज्यांना ‘रिब’ म्हणतात. हे रिब पंखांना विशिष्ट आकार आणि मजबूती देतात.
स्किन (Skin): पंखांच्या वरचा जो पातळ थर असतो. त्याला ‘स्किन’ म्हणतात. हे सर्व घटक मिळून पंखांना मजबूती आणि पोकळ रचना देतात.
पंखांच्या आत या ‘स्पार्स’ आणि ‘रिब्स’ दरम्यान जी रिकामी जागा उरते. तिचे लहान-लहान भागात विभाजन केले जाते. हे कप्पे पूर्णपणे सीलबंद असतात. ज्यामुळे इंधन अजिबात बाहेर गळत नाही. हे पंखांच्या आतील हे खास कप्पे विमानासाठी ‘इंधनाची टाकी’ म्हणून काम करतात.