फोटो सैजन्य - सोशल मीडिया
समवर्ती लेखापरीक्षकाचे (Concurrent Auditor) मुख्य काम बँकेच्या शाखांमध्ये होणारे व्यवहार, रेकॉर्ड आणि कामकाजाच्या प्रक्रियेची नियमित तपासणी करणे हे असते. ज्या उमेद्वारांना बँकिग नियमांची, खात्याची तपासणी आणि ऑडिट प्रक्रियेची चांगली समज आहे, ते या पदावर उत्तम प्रकारे काम करू शकतात.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेद्वाराच्या वयाची गणना १४ मे २०२६ या तारखेच्या आधारावर केली जाईल. या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ६३ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. तसेच या भरती वयोमर्यादेत प्रवर्गानुसार कोणत्याही प्रकारची सुट दिली जाणार नाही.
उमेद्वाराची निवड प्रामुख्याने शॉर्टलिस्टिंग मुलाखत(Interview) आणि गुणवत्ता यादीच्या (Merit List) आधारे केली जाईल. तसेच ज्या उमेद्वाराचा अनुभव आणि प्रोफाइल उत्तम असेल. त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
वेतन श्रेणी (सॅलरी) : या पदासाठी ग्रेडनुसार पागार निश्चित करण्यात आला आहे.
इच्छुक उमेद्वार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज भरताना उमेद्वारांनी आपली सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. तसेच उमेद्वारांना गरजेनुसार कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या कॉपी अपलोड कराव्या लागतील. तसेच अर्ज पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ठेवणे आवश्यक आहे.






