
Image
जपानच्या प्रतिष्ठित ‘PRESIDENT’ मॅगझिनने आनंद कुमार यांच्या जीवनावर आणि त्यांच्या शिक्षणाशी संबंधित उपक्रमावर दोन भागांत लेख प्रकाशित केला आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, पैशांच्या अभावामुळे ज्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, अशा एका मुलाने आपल्या मेहनतीने हजारो मुलांचे आयुष्य बदलण्याचे काम कसे केले.
या मॅगझिननुसार, आनंद कुमार यांचा उद्देश फक्त मुलांना गणित न शिकवता त्याच्यामधअये विचार करण्याची प्रश्न विचारण्याची आणि समजुतीने उत्तरे शोधण्याची सवय विकसित करणे हे देखील आहे.
आनंद कुमार यांचा जन्म १ जानेवारी १९७३ रोजी बिहारची राजधानी पटना येथे झाला. त्यांचे वडील राजेंद्र प्रसाद हे टपाल खात्यात (डाक विभाग) क्लर्क होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, परंतु त्यांचे वडील शिक्षणाला आयुष्य बदलण्याचे सर्वात मोठे माध्यम मानत असत.
आनंद यांना बालपणापासूनच गणितामध्ये मोठी आवड होती. त्यांच्या या प्रतिभेने त्यांना पुढे जाण्याचे स्वप्नही दाखवले, परंतु पैशांच्या कमतरतेमुळे त्यांना कॅम्ब्रिज विद्यापीठात शिकण्याचे आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही. तथापि, या अडचणीने त्यांना त्यांच्या लक्ष्यापासून मागे हटवले नाही. त्यांनी आपले ज्ञान आणि शिकवण्याच्या पद्धतीचा वापर इतर मुलांना पुढे नेण्यासाठी केला.
पटना येथे त्यांचे बालमले अतिशय साध्या परिस्थितीत गेले. त्यांचे कुटुंब रेल्वे लाईन्सच्या जवळ असलेल्या एका छोट्या घरात राहत होते. आजूबाजूला सतत गाड्यांचा (ट्रेन्सचा) आवाज येत असे. असे असतानाही आनंद अभ्यासामध्ये मग्न राहत असत. कठीण परिस्थितीच्या दरम्यानही त्यांचे लक्ष गणितावरच केंद्रित असे. हीच निष्ठा पुढे जाऊन त्यांची ओळख बनली.
आनंद कुमार यांना देशपातळीवर ओळख त्यांच्या ‘सुपर ३०’ या कार्यक्रमामुळे मिळाली. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होतकरू मुलांना आयआयटीच्या प्रवेश परीक्षेची म्हणजेच ‘JEE’ ची तयारी करण्यास मदत केली.
वास्तविकता, आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे हे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. परंतु, चांगल्या कोचिंगची फी अनेक कुटुंबांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. ‘सुपर ३०’ च्या माध्यमातून आनंद कुमार यांनी अशा मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, ज्यांच्याकडे संसाधनांची कमतरता होती, परंतु पुढे जाण्याचा जिद्द होती.
जापानी मॅगझिननेही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. जपानमधील वाचकांना आयआयटीचे महत्त्व समजून सांगण्यासाठी या लेखात त्याची तुलना ‘टोकियो युनिव्हर्सिटी’सोबतही करण्यात आली आहे. अशा प्रकारे आनंद कुमार यांचे काम भारताबाहेरील वाचकांपर्यंत पोहोचवले गेले आहे.
आनंद कुमार यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कठीण प्रश्न सोपे करण्यासाठी गोष्टी आणि काल्पनिक पात्रांची मदत घेतात. त्यांचे ‘भोलू’ आणि ‘रिकी’ सारखे पात्र मुलांना गणित समजून घेण्यास मदत करतात. या पद्धतीमुळे मुले केवळ प्रश्नाचे उत्तर पाठ करत नाहीत, तर त्यामागचा युक्तिवाद (लजिक) समजून घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते कठीण प्रश्नांना घाबरण्याऐवजी ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः ज्या मुलांना गणित अवघड वाटते किंवा ज्यांना अभ्यासासाठी पुरेशी संसाधने मिळत नाहीत, अशा मुलांसाठी हा मार्ग अतिशय उपयुक्त ठरू शकतो.
आनंद कुमार यांच्या ‘सुपर इन्फिनिटी’ या डिजिटल उपक्रमाचा उद्देश शिकवण्याची ही पद्धत जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवणे हा आहे. याद्वारे मोफत डिजिटल शिक्षणाच्या मदतीने गणित सोपे आणि रंजक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मॅगझिनने या उपक्रमांतर्गत शैक्षणिक व्हिडिओ जपानी भाषेतही उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा उल्लेख केला आहे. यामुळे जपानमधील मुलांनाही स्वतःच्या भाषेत या व्हिडिओंच्या माध्यमातून शिकण्याची संधी मिळू शकते.
या उपक्रमाची खासियत म्हणजे ऑनलाइन माध्यमाद्वारे शिक्षण अशा मुलांपर्यंत पोहोचवले जाऊ शकते, ज्यांच्यासाठी चांगल्या कोचिंग किंवा अनुभवी शिक्षकांपर्यंत पोहोचणे कठीण असते. तथापि, याचा खरा परिणाम या गोष्टीवर अवलंबून असेल की मुलांना या संसाधनांचा किती लाभ मिळतो.
Ans: ‘सुपर इन्फिनिटी’ या डिजिटल उपक्रमाची चर्चा जपानच्या प्रसिद्ध ‘PRESIDENT’ मॅगझिनमध्ये झाली आहे.
Ans: जपानमधील वाचकांना आयआयटीचे महत्त्व समजून सांगण्यासाठी या लेखात त्याची तुलना ‘टोकियो युनिव्हर्सिटी’ सोबत करण्यात आली आहे.
Ans: ते कठीण प्रश्न सोपे करण्यासाठी गोष्टी आणि काल्पनिक पात्रांचा (उदा. 'भोलू' आणि 'रिकी') आधार घेतात, ज्यामुळे मुले त्यामागचा युक्तिवाद (लजिक) सहज समजू शकतात.