
फोटो सौजन्य - Social Media
कार्यक्रमात भारताच्या विविध प्रांतातील वाद्यांचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. पंजाबचे ढोल, बिहारची सारंगी, महाराष्ट्राची तुतारी, गोव्याचा घूमर नृत्यभाव, उत्तर प्रदेशची शहनाई अशा सुरांच्या साथीने विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केले. मध्य प्रदेशचा नगारा, आंध्र प्रदेशचे गोटू वाद्यम, छत्तीसगडचे धनफुल, पश्चिम बंगालचा एकतारा यांच्याद्वारे भारताच्या विविध रंगांची ओळख करून देण्यात आली. गुजरात ढोलक, तेलंगाणाचे किनारा वाद्य, कर्नाटकची विणा, दादरा नगर हवेलीचे सर्पा वाद्य यामुळे कार्यक्रम अधिक समृद्ध झाला. तमिळनाडूच्या मृदंगावर नृत्य केलेला सादरीकरण विशेष दाद घेऊन गेला.
कार्यक्रमाला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. मुलांच्या प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांचा कडकडाट मिळत होता. यामुळे लहानग्यांचा आत्मविश्वास अधिक वृद्धिंगत झाला. शाळेच्या सांस्कृतिक उपक्रमांना पालकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल व्यवस्थापनाने कृतज्ञता व्यक्त केली.
पोदार प्रेप शाळा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवते. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जागरूकता, टीमवर्क, स्टेज उपस्थिती आणि आत्मविश्वास वाढवणे हा उद्देश असल्याचे शिक्षकांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मालती कायदे यांनी मुलांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले. रंगीत वेशभूषा, राज्यनिहाय सादरीकरणे आणि सुरेल संगीतामुळे कार्यक्रमात भारताची विविधता उजळून निघाली आणि लहानग्यांनी भरभरून जल्लोष साजरा केला.