फोटो सौजन्य - Social Media
या भरतीत अनेक पदे भरली जाणार आहेत. या पदांमध्ये पुढील पदांचा समावेश आहे: डिप्टी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, AEE. (वरिष्ठ पदे) JE, पटवारी, JSA, स्टेनोग्राफर D, MTS. (तांत्रिक, प्रशासकीय व सपोर्ट स्टाफची पदे) ग्रुप A मध्ये 53, ग्रुप B मध्ये 324 आणि ग्रुप C मध्ये 1,355 पदे आहेत. कॅटेगरीनुसार आरक्षित प्रवर्गात या पदांना वाटण्यात आले आहे. अनारक्षित प्रवर्गासाठी 769 पदे रिक्त आहेत, OBC-NCL पदासाठी 452 रिक्त आहेत, EWS प्रवर्गासाठी 173 पदे रिक्त आहेत, SC प्रवर्गासाठी 207 पदे रिक्त आहेत आणि ST प्रवर्गासाठी 131 रिक्त पदे उपलब्ध आहेत.
या भरतीसाठी मल्टी-स्टेज सिलेक्शन प्रोसेस ठेवण्यात आली आहे. प्रथम CBT, त्यानंतर संबंधित पदांसाठी स्किल टेस्ट, टायपिंग टेस्ट किंवा इंटरव्ह्यू होणार असून शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि (लागू असेल तर) मेडिकल तपासणी केली जाईल. अर्ज शुल्क UR/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹2,500 तर SC/ST/PwBD/महिला/माजी सैनिक/ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी ₹1,500 आहे. आरक्षणातील पात्र उमेदवारांना ही फी परीक्षेनंतर रिफंड मिळणार असून फक्त बँक शुल्क वजा केले जाईल.
या संबंधित अधिक माहिती DDA च्या साईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक खोल माहितीसाठी उमेदवारांनी त्यांच्या साईटला भेट द्यावी आणि परीक्षेच्या तयारीला लागावे.






