फोटो सौजन्य - Social Media
इंडियन आर्मीने भरतीच्या प्रक्रियेचे आयोजन केले आहे. Army SSC टेक एंट्रीमध्ये स्त्री तसेच पुरुषांसाठी रिक्त जागा आहेत. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना ७ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण भारत भरात ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. रिक्त जागांमध्ये ३५० जागा पुरुषांसाठी आहे. २९ जागा स्त्रियांसाठी आहे. तर २ जागा विधवा स्त्रियांसाठी राखीव आहे. स्त्री तसेच पुरुष दोन्ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ७ जानेवारी, २०२५ पासून इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येऊ शकते. तसेच या भरतीसाठी उमेदवारांना ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भात महत्वाची बाब म्हणजे अर्ज करताना उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही आहे.
या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास इछुकल असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. अर्ज करता उमेदवार अभियांत्रिकी क्षेत्रातील आहे. उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून पदवीधर असणे अनिवार्य आहे. तसेच या भरतीसाठी किमान वय २० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त २७ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर विधवा स्त्रियांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा आयु ३५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या शैक्षणिक अटी तसेच वयोमर्यादे संबंधित अटी शर्ती अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. या संबंधित जाणून घेण्यासाठी तसेच संपूर्ण सखोल माहितीचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
आर्मी SSC टेक एंट्रीच्या भरतीसाठी नियुक्तीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांच्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल. तसेच दोन टप्प्यांमध्ये मुलाखत आयोजित केली जाईल. तसेच उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच शेवटी अंतिम मेरिट लिस्टच्या माध्यमातून नियुक्त उमेदवाराचे नावे प्रसिद्ध करण्यात येतील.
चला तर मग आर्मी SSC टेक ट्रेनिंगबद्दल काही महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात:
भरतीमध्ये एकूण रिक्त जागा किती?
SSC (टेक) मध्ये पुरुषांसाठी एकूण ३५० जागा रिक्त आहेत. तर SSC (टेक) मध्ये महिलांसाठी एकूण २९ जागा रिक्त आहेत. तसेच विधवा स्त्रिया (Defense Personnel) यांच्यासाठी टेक्निकल विभागात १ जागा रिक्त आहेत आणि १ जागा नॉन टेक्निकल विभागामध्ये रिक्त आहे.