फोटो सौजन्य - Social Media
नेशनल युनिव्हर्सिटी ऑफ स्टडी अँड रिसर्च इन लॉ (NUSRL) रांची येथे लॉ प्रोफेसर पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. कायद्याच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेल्या आणि अनुभवसंपन्न उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
रिक्त पद आणि पात्रता
या भरतीमध्ये प्राध्यापक (Professor of Law) पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कायद्यात पीएचडी पदवी असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर मास्टर्स पदवीत किमान 50 टक्के गुण मिळालेले असावेत. याशिवाय, उमेदवाराला असोसिएट प्रोफेसर किंवा समकक्ष पदावर किमान 10 वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. संशोधन क्षेत्रातही उमेदवाराने उत्कृष्ट कामगिरी केलेली असावी. त्यासाठी किमान 10 रिसर्च पेपर्स, संशोधन लेख किंवा पुस्तके प्रकाशित केलेली असणे आवश्यक आहे.
वेतनमान
या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनमान दिले जाणार आहे. उमेदवारांना दरमहा ₹1,44,200 ते ₹2,18,200 या पे लेव्हलनुसार पगार मिळेल. याशिवाय इतर भत्ते आणि सुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिल्या जातील.
अर्ज करण्याची प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट nusrlranchi.ac.in ला भेट द्यावी. तिथे Recruitment – Professor of Law हा लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्जपत्र उघडेल. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि संपर्काची सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे.
यानंतर अर्जाची हार्ड कॉपी तयार करून त्यासोबत ₹1000 चा डिमांड ड्राफ्ट, स्वप्रमाणित कागदपत्रांच्या प्रती आणि उमेदवाराचा सीव्ही जोडावा. हे सर्व कागदपत्रे खालील पत्त्यावर पाठवायची आहेत – The Registrar, National University of Study and Research in Law, Ranchi.
तसेच, इच्छुक उमेदवार अर्जाची सॉफ्ट कॉपी jobs@nusrlranchi.ac.in या मेल आयडीवरही पाठवू शकतात. मात्र, लक्षात ठेवा – ऑनलाइन, ऑफलाइन किंवा ई-मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2025 आहे.
महत्त्वाची सूचना
भरतीसंबंधी अधिक तपशीलवार माहिती आणि नोटिफिकेशनसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. योग्य पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम करिअर संधी आहे.