Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! कॉपी केल्यास थेट जेल; संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज. टोकन पद्धतीने तपासणी, ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्ही वॉच राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 07, 2026 | 04:18 PM
बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन 'ॲक्शन मोड'वर! कॉपी केल्यास थेट जेल (Photo Credit- X)

बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन 'ॲक्शन मोड'वर! कॉपी केल्यास थेट जेल (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर!
  • कॉपी केल्यास थेट जेल
  • संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन व माध्यमिक शिक्षण विभागामार्फत बहुआयामी व कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र संचालक, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, बैठे पथक व संबंधित पर्यवेक्षी यंत्रणांची आढावा बैठक शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडली.

बैठकीत शून्य सहनशीलता भूमिकेवर प्रशासन ठाम असून, महाराष्ट्र प्रतिबंधक गैरप्रवृत्ती अधिनियम, १९८२ तसेच मंडळाच्या शिक्षासूचनेनुसार दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यात कोणत्याही घटकाची गय केली जाणार नाही. गैरप्रकार करणाऱ्यांसोबतच त्यास मदत करणारे, दुर्लक्ष करणारे किंवा जाणीवपूर्वक डोळेझाक करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही समान स्वरूपाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे.

परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार, कॉपी अथवा मालप्रॅक्टिसेस कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. यावर्षी भरारी पथकामार्फत नव्याने टोकन पद्धतीने विद्यार्थ्यांची तपासणी परीक्षेदरम्यान करण्यात येणार आहे. अनुक्रमांक १ ते ५०, ५१ ते १०० अशा गटांनुसार टोकन देऊन दालननिहाय कसून तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान ज्या दालनात कॉपी अथवा गैरप्रकार आढळून येईल, त्या दालनातील परीक्षार्थी, संबंधित पर्यवेक्षक, केंद्रसंचालक तसेच बैठेपथक यांच्यावर
थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच बैठे पथक नियुक्त असतानाही गैरप्रकार झाल्यास, संबंधित पथकावरही कार्यवाही करण्यात येईल.

परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ कलमानुसार अनधिकृत जमाव, संशयास्पद हालचाली किंवा दबावतंत्र सहन केले जाणार नाही. जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष व परीक्षा वॉर रूम कार्यान्वित राहणार असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर थेट देखरेख ठेवली जाणार आहे. संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेरे, विशेष भरारी पथके व नियमित बैठे पथके परीक्षा सुरू होण्यापासून संपेपर्यंत तैनात असणार आहेत. विशेष म्हणजे, २६ जानेवारी रोजी जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्तीची सामूहिक शपथ घेतली आहे. या परीक्षेत गैरप्रकार किंवा त्याकडे केलेली डोळेझाक माफ केली जाणार नाही. यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारीने दक्षता घ्यावी, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी केले आहे.

Career News: तरुणांनो तयार व्हा! कौशल्य विकास आणि विद्यापीठाचा पुढाकार; ११ फेब्रुवारीला ‘या’ शहरात रंगणार रोजगार मेळावा

दक्षता समिती सज्ज

कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती कार्यरत केली आहे. यात अध्यक्ष जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तर सदस्य म्हणून झेडपी सीईओ अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तरीत्या, लॉटरी पद्धतीने अचानक भेटी व तपासण्या घेण्यात येतील. परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स बंद असतील. पालकांसाठी परीक्षा केंद्राबाहेर पंडाल असतील. विद्यार्थ्यांना पाणी, वीज, पंखे, प्रकाश आदी सुविधा करण्याची जबाबदारी केंद्र संचालकांची असेल.

संवेदनशील केंद्रांवर विशेष ‘वॉच’

यावर्षी इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होत आहे. जिल्ह्यातील १५९ परीक्षा केंद्रांवर एकूण ६५ हजार ५१६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यापैकी ७ परीक्षा केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, या सर्व केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक व संपूर्ण परीक्षा कर्मचारी यांची अदलाबदल करून पूर्णपणे नवीन स्टाफ नियुक्त करण्यात येणार आहे. या केंद्रांवर प्रशासनाची विशेष करडी नजर राहणार आहे.

१०० केंद्रांवर पूर्णवेळ व्हिडीओ चित्रीकरण

सर्व परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक दालनात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असणे बंधनकारक आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर काही दालनांमध्ये सीसीटीव्ही असून काही दालनांमध्ये नाहीत, अशा परिस्थितीत त्या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ तात्काळ बदलण्यात येणार आहे, तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून त्या केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार आहे, यावर्षी निवडक १०० परीक्षा केंद्रांवर पूर्ण वेळ व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असून, इतर सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज परीक्षा संपल्यानंतर पेन ड्राइव्हद्वारे केंद्र संचालकांकडून जमा करण्यात येणार आहे.

परीक्षेविना सरकारी नोकरीची संधी! ‘या’ बँकेत भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Web Title: Hsc exam 2026 chhatrapati sambhajinagar copy free campaign strict rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Career News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • hsc exam

संबंधित बातम्या

बीएड सीईटी परीक्षेच्या पहिल्या दिवशी ८९% उपस्थिती; तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील तीन परीक्षा केंद्राची परीक्षा पुढे ढकलली!
1

बीएड सीईटी परीक्षेच्या पहिल्या दिवशी ८९% उपस्थिती; तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील तीन परीक्षा केंद्राची परीक्षा पुढे ढकलली!

युद्धाच्या काळातही सुरक्षित राहणाऱ्या नोकऱ्या, काय आहे ‘War-Proof’ Career? जाणून घ्या सविस्तर
2

युद्धाच्या काळातही सुरक्षित राहणाऱ्या नोकऱ्या, काय आहे ‘War-Proof’ Career? जाणून घ्या सविस्तर

शाळा आपल्या दारी! मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण विभागाची विशेष मोहीम
3

शाळा आपल्या दारी! मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण विभागाची विशेष मोहीम

Career 2026 : लाखांत नाही तर आता करोडोंमध्ये कमवा! 10 वी-12 वी नंतर ‘हे’ 5 ऑफबीट कोर्सेस देतील छप्परफाड सॅलरी
4

Career 2026 : लाखांत नाही तर आता करोडोंमध्ये कमवा! 10 वी-12 वी नंतर ‘हे’ 5 ऑफबीट कोर्सेस देतील छप्परफाड सॅलरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.