फोटो सौजन्य - Social Media
भारतीय सैन्यदलाने भरतीचे आयोजन केले आहे. या भरतीच्या माध्यमातून काही विशेष पदे भरण्यात येणार आहेत. तसेच या पदांना भरण्यासाठी तसेच या भरतीच्या प्रसारासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली मध्यप्रदेश येथे आयोजित आहे. Unit Headquarters Quota at 3 EME Centre, Bairagarh, Bhopal (MP) या पत्त्यावर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ७ जानेवारी २०२५ या तारखेपासून भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केले जाणार आहे. एकंदरीत, या तारखेपासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. १९ मार्च २०२५ पर्यंत उमेदवारांना या भर्तीसाठी अर्ज करता येणार आहे.
अग्नीवर जनरल ड्युटी, टेक्निकल ऑफिस असिस्टंट आणि ट्रेड्समनच्या रिक्त पदासाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध पदांसाठी रॅलीची तारीख वेगेवेगळी आहे. अग्नीवर जनरल ड्युटी पदासाठी रॅली ७ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. अग्नीवर टेक्निकलच्या पदासाठी रॅली १० जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. अग्नीवर ऑफिस असिस्टंटच्या पदासाठी रॅली १३ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे तर अग्नीविर ट्रेड्समनच्या पदासाठी १५ जानेवारी २०२५ रोजी रॅली आयोजित करण्यात आली आहे.
तसेच भारतीय सैन्याच्या या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक अग्निवीर उमेदवारांना काही निकष पात्र करावे लागणार आहेत. कमीत कमी १७ वर्षे ६ महिने आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २१ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी काही शैक्षणिक अटी देखील निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवारांना अग्निपथ स्कीम गाईडलाईन्स पाहता तसेच डाउनलोड करता येणार आहे.
या अग्नीवीर भरतीमध्ये काही आवश्यक कागदपत्रे यांची आवश्यकता आहे. उमेदवारांना काही कागदपत्रांची गरज भासणार आहे. यामध्ये व्हाईट बॅकग्राऊंड असणारे २० पासपोर्ट साईज फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, धर्म प्रमाणपत्र, शाळेचा चारित्र्य प्रमाणपत्र, अविवाहित प्रमाणपत्र, जर उमेदवार सेवेत/माजी सैनिकांचा वारस आहे तर नाते प्रमाणपत्र, NCC आणि क्रीडा प्रमाणपत्रे (लागू असल्यास), बँक खाते तपशील, पॅन कार्ड आणि आधार कार्ड, पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र तसेच प्रतिज्ञापत्रे या कागदपत्रांचा समावेश आहे.
या भरतीविषयी काही अतिरिक्त माहिती: