फोटो सौजन्य - Social Media
इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB)ने अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेमध्ये भरती संदर्भात सखोल माहिती देण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केले आहे. उमेदवारांना डिसेंबरच्या २१ तारखेपासून या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. अर्ज करण्याची विंडो सकाळी १० वाजपल्यापासून सुरु करण्यात येणार आहे. तसेच अर्ज करण्याची विंडो जानेवारीच्या १० तारखेपर्यंत खुली असणार आहे. मध्यरात्रीच्या १२ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
या भरतीच्या माध्यमातून IT क्षेत्रातील पदे भरण्यात येणार आहेत. असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी ५१ जागा रिक्त आहेत. मॅनेजरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे. औद्योगिकीय विभागात मॅनेजरच्या पदासाठी २ जागा रिक्त आहेत. तसेच एंटरप्राइज डेटा वेअरहाऊसच्या पदासाठी १ जागा रिक्त आहेत. सिनिअर मॅनेजरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे. औद्योगिकीय विभागात सिनिअर मॅनेजरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे. तर व्हेंडर विभागातील सिनिअर मॅनेजरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे. तर Contractual भरतीमध्ये सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट पदाच्या ७ रिक्त जागांना भरण्यात येणार आहे. यातील ४ जागा सामान्य प्रवर्गासाठी, २ जागा OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी तसेच EWS प्रवर्गासाठी १ जागा रिक्त आहे.
IPPB च्या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत, ज्या उमेदवारांना पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा यांचा समावेश आहे. उमेदवारांनी अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असणे बंधनकारक आहे, तसेच IT क्षेत्र किंवा कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास केलेला असावा.
भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा किंवा मुलाखत आयोजित केली जाईल, ज्याच्या आधारे अंतिम निवड होईल. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी [ippbonline.com](https://www.ippbonline.com) या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिसूचनेमध्ये या भरती संदर्भात महत्वाची आणि सखोल माहिती नमूद करण्यात आली आहे. यामध्ये विविध पदांसाठी नियुक्ती होणार असून, अर्ज प्रक्रिया सुलभ आणि ऑनलाईन स्वरूपात आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि अटींची पूर्तता करून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.