फोटो सौजन्य - Social Media
भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल आणि वायुदलातील अधिकारी पदांसाठी काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रशिक्षणामध्ये कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) परीक्षेची पूर्व तयारी करून दिली जाईल. यामुळे उमेदवारांना सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळेल. जर तुम्ही सैन्य दलात भरती होण्यास इच्छुक आहात आणि मुख्यता अधिकारी बनण्यासाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच या संधीचा लाभ घेण्यात यावा.
प्रशिक्षणाची तारीख आणि ठिकाण काय आहे?
हे प्रशिक्षण नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात २० जानेवारी २०२५ पासून आयोजित करण्यात आले आहे. तसेच ४ एप्रिल २०२५ पर्यंत याचे आयोजन राहणार आहे. या कालावधीत प्रशिक्षण घेताना उमेदवारांना पूर्णपणे निशुल्क अभ्यासक्रम, निवास व भोजनाची सोय उपलब्ध असेल. या प्रशिक्षणाचा उद्देश उमेदवारांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना CDS परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सज्ज करणे आहे.
मुलाखतीचे वेळापत्रक:
मुंबई शहरातील इच्छुक उमेदवारांसाठी ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) च्या अधिकृत संकेतस्थळावरून CDS-64 कोर्ससाठीचे प्रवेशपत्र डाउनलोड करावे. या प्रवेशपत्रासोबत दिलेली आवश्यक परिशिष्टे आणि कागदपत्रे भरून मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
उमेदवारांना यासाठी अर्ज करण्यासाठी काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. हे निकष पात्र करणे फार आवश्यक आहे. अर्ज कर्ता उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे अनिवार्य आहे. उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेतल्या जाणाऱ्या CDS परीक्षेसाठी अर्ज केलेला असावा. तसेच अर्ज करताना आवश्यक पात्रता प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे.
अधिक माहिती आणि संपर्क:
प्रशिक्षणाबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा. ईमेल आयडी: training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक: ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक: 9156073306 या माध्यमातून चौकशी करता येईल. उमेदवारांना प्रत्यक्ष भेटीद्वारेही माहिती दिली जाईल.
महत्त्व:
हे प्रशिक्षण उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त असून सैन्यदलातील अधिकारी पदासाठी आवश्यक असलेल्या परीक्षेची तयारी करण्यासाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी दिलेल्या तारखांमध्ये अर्ज करून मुलाखतीसाठी हजर राहावे.