Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँक ऑफ बडोदा ऑफिस असिस्टंट भरती 2025: एकूण 500 जणांची केली जाईल नियुक्ती

बँक ऑफ बडोदाने सब-स्टाफ कॅडर अंतर्गत 500 ऑफिस असिस्टंट (पियून) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 3 मे ते 23 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 03, 2025 | 03:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारताच्या आघाडीच्या सार्वजनिक बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने ऑफिस असिस्टंट (पियून) पदासाठी 500 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती सब-स्टाफ कॅडर अंतर्गत नियमित स्वरूपात केली जाणार असून, संपूर्ण देशभरातील शाखा आणि कार्यालयांमध्ये ही पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेमुळे बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

काय असतं Sound इंजिनिअरिंग? कसे करावे करिअर? Music क्षेत्रात मोठ्या संधी

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 3 मे 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मे 2025 आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.in वर जाऊन आपला अर्ज सादर करावा. अर्जाची फी सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ₹600 तर अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी ₹100 निश्चित करण्यात आली आहे. फीचे पेमेंट ऑनलाइन पद्धतीने करावे लागेल. या पदांसाठी पात्रता मापदंडानुसार उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वयमर्यादा 1 मे 2025 रोजी 18 ते 26 वर्षे दरम्यान असावी. मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासन नियमानुसार वयामध्ये सवलत लागू होईल.

निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा, स्थानिक भाषा चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा चार प्रमुख टप्प्यांवर आधारित असेल. या प्रक्रियेद्वारे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, भाषाज्ञान, शारीरिक स्वास्थ्य आणि अधिकृत दस्तऐवजांची पडताळणी केली जाईल. विशेष म्हणजे, या पदासाठी कोणतीही उच्च शैक्षणिक पात्रता आवश्यक नसून केवळ 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. त्यामुळे अल्पशिक्षित पण मेहनती आणि बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम आणि दुर्मिळ संधी आहे.

विदेशी शिक्षणाची स्वप्ने आता नवी मुंबईतच पूर्ण होणार; 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार

इच्छुक उमेदवारांनी भरतीसंदर्भातील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा, कारण कोणतीही माहिती चुकीची भरल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. ही भरती प्रक्रिया ही केवळ नोकरी मिळवण्याची पायरी नसून, बँकिंग क्षेत्रात एक स्थिर, सुरक्षित आणि सन्माननीय करिअर घडवण्याची दिशा आहे. त्यामुळे जे उमेदवार पात्र आहेत, त्यांनी ही संधी न दवडता, वेळेच्या आत अर्ज सादर करून आपल्या उज्वल भविष्यासाठी पहिला ठोस टप्पा पार करावा.

Web Title: Bank of baroda office assistant peon recruitment 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Bank OF Baroda
  • Government Job

संबंधित बातम्या

NSG Commandos Salary: देशातील सर्वात धोकादायक ‘NSG’ कमांडोची निवड कशी होते? वाचा त्यांच्या पगार आणि निवृत्तीनंतरचे फायदे
1

NSG Commandos Salary: देशातील सर्वात धोकादायक ‘NSG’ कमांडोची निवड कशी होते? वाचा त्यांच्या पगार आणि निवृत्तीनंतरचे फायदे

RRB Technician Recruitment 2026: रेल्वेत टेक्निशियन पदांसाठी बंपर भरती; आजपासून अर्ज सुरू, जाणून घ्या पात्रता
2

RRB Technician Recruitment 2026: रेल्वेत टेक्निशियन पदांसाठी बंपर भरती; आजपासून अर्ज सुरू, जाणून घ्या पात्रता

UPSC Mains 2026: यूपीएससी ‘मेन्स’चा अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख; ‘हा’ फॉर्म सबमिट न केल्यास परीक्षेला बसता येणार नाही
3

UPSC Mains 2026: यूपीएससी ‘मेन्स’चा अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख; ‘हा’ फॉर्म सबमिट न केल्यास परीक्षेला बसता येणार नाही

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी
4

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.