फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CA Exam Age Limit: देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित प्रोफेशनल कोर्सेसच्या यादीत चार्टर्ड अकाउंटन्सीचे (CA) नाव सर्वात वर येते. अनेकदा तरुण शाळा किंवा कॉलेज संपताच सीएच्या तयारीला लागतात. पण अनेकदा परिस्थितीमुळे, नोकरीच्या व्यग्रतेमुळे किंवा उशिरा निर्णय घेतल्यामुळे काही लोक २५, ३० किंवा ४० व्या वर्षी सीए बनण्याचा विचार करतात. अशा वेळी त्यांच्या मनात सर्वात पहिला आणि मोठा प्रश्न हाच येतो की, सीए परीक्षा देण्यासाठी काही वयोमर्यादा असते का?
जर तुमच्याही मनात अशीच शंका असेल, तर एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतात सीए परीक्षा घेणारी संस्था ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) ने सीए बनण्यासाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. म्हणजेच तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असाल, जर अभ्यास करण्याची जिद्द आणि आवड असेल तर तुम्ही सीए परीक्षा देऊ शकता. सीए परीक्षेची पात्रता, वयोमर्यादेशी संबंधित नियम आणि या क्षेत्रात प्रवेश करण्याचे मार्ग कोणते आहेत, ते जाणून घ्या.
सीए बनण्यासाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही. तुम्ही १८ वर्षांचे तरुण असाल, ३५ वर्षांचे जॉब प्रोफेसनल असाल किंवा ५० वर्षांचे गृहस्थ असाल, कधीही सीए कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता.
४०-५० व्या वर्षी सीए परीक्षा देण्याचे जसे फायदे आहेत, तसेच काही आव्हानेही आहेत:
फायदे: या वयातील उमेदवारांमध्ये प्रगल्भता, कामाचा अनुभव आणि आर्थिक समज अधिक चांगली असते. ते अभ्यासाबाबत अधिक गंभीर असतात.
आव्हाने: कुटुंबाची जबाबदारी, नोकरीसोबतच ३ वर्षांचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग यासाठी वेळ काढणे आणि अभ्यासाचे लांब तास मॅनेज करणे थोडे कठीण जाते.
जर कष्टाची जिद्द असेल आणि अकाउंट्स, टॅक्स व फायनान्सच्या दुनियेत नाव कमावायचे असेल तर वयाचा आकडा हा फक्त एक नंबर आहे. आजच तयारी सुरू करा आणि नावापुढे ‘CA’ लावण्याचे स्वप्न पूर्ण करा.