
Image
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सप्टेंबर २०२६ च्या ग्रुप १ चा पासिंग टक्केवारी २३.१४ टक्के इतकी राहिली. यामध्ये परीक्षेत सहभागी झालेल्या १,००,३०१ उमेदवारांपैकी २३,२१० उमेदवार पास झाले. तर ग्रुप २ साठी ६८,४०० उमेदवारांपैकी १२,९३८ उमेदवार पास झाले, ज्याचा पासिंग टक्केवारी १८.९२ टक्के इतकी होती. दोन्ही ग्रुपसाठी परीक्षा देणाऱ्या ३८,३३९ उमेदवारांपैकी ५,०६६ उमेदवार पास झाले, ज्यामध्ये एकूण पासिंग टक्केवारी ३०.२१ टक्के राहिली.
रँक १: नील राजेश शाह – ५०२ गुण आणि ८३.६७ टक्के
रँक १: चंदक साक्षी – ५०२ गुण आणि ८३.६७ टक्के
रँक २: श्रुति वी – ४९२ गुण आणि ८२ टक्के
रँक ३: प्रेम अग्रवाल – ४९० गुण आणि ८१.६७ टक्के
सीए इंटरमीडिएट ग्रुप १ ची परीक्षा १, ३ आणि ६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती, तर ग्रुप २ ची परीक्षा ८, १० आणि १२ सप्टेंबर रोजी झाली होती. ग्रुप १ मध्ये १ सप्टेंबर रोजी ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग, ३ सप्टेंबर रोजी कॉर्पोरेट अँड अदर लॉज आणि ६ सप्टेंबर रोजी टॅक्सेशनची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तर ग्रुप २ मध्ये ८ सप्टेंबर रोजी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, १० सप्टेंबर रोजी ऑडिटींग अँड एथिक्स आणि १२ सप्टेंबर रोजी फायनान्शियल मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची परीक्षा पार पडली. त्यानंतर आता २२ ऑक्टोबर रोजी सीए इंटरमीडिएट सप्टेंबर २०२६ परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
NEET PG Counseling 2026: नीट पीजी प्रवेश प्रक्रिया सुरू; २६ ऑक्टोबरपर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन!
१. सीए इंटर २०२६ चा निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम caresults.icai.org या वेबसाइटवर जा.
२. त्यानंतर होम पेजवर सीए इंटरमीडिएट सप्टेंबर २०२६ निकाल असलेल्या लिंकवर क्लिक करा.
३. आता आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर प्रविष्ट करा.
४. यानंतर कॅप्चा कोड भरून सबमिटवर क्लिक करा.
५. सबमिटवर क्लिक करताच स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल.
६. आता निकाल तपासून त्याची प्रिंटआऊट डाऊनलोड करून सुरक्षित ठेवा.
Ans: उमेदवार त्यांचा निकाल ICAI च्या अधिकृत वेबसाइट caresults.icai.org वर जाऊन तपासू शकतात.
Ans: नील राजेश शाह आणि चंदक साक्षी यांनी संयुक्तपणे ५०२ गुणांसह (८३.६७%) ऑल इंडिया रँक १ (AIR 1) मिळवला आहे.
Ans: दोन्ही ग्रुपची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकूण पासिंग टक्केवारी ३०.२१% राहिला आहे.