15 जुलैपासून सुरु होणार 10वी-12वीची CBSE ची पुरवणी परीक्षा
ज्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्ड कंपार्टमेंट परीक्षेसाठी अर्ज केला आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10 वी आणि 12 वी कंपार्टमेंट परीक्षांची घोषणा केली आहे. मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 15 जुलै ते 22 जुलै या कालावधीत कंपार्टमेंट परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात.
काय असेल पेपरची वेळ?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 10 वी आणि 12 वीची पुरवणी परीक्षा ही सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या अवघ्या 15 मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. जर कोणत्याही विद्यार्थ्याला एका किंवा दोन विषयात किमान गुण म्हणजे 33 पेक्षा कमी गुण असतील तर त्यांच्यासाठी ही कंपार्टमेंट परीक्षा घेतली जाणार आहे. मंडळाच्या माहितीनुसार, इयत्ता 10 वीतील एकूण 1,32,337 विद्यार्थी आणि 12 वीमधील 1,22,170 विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
(फोटो सौजन्य : istock)
काय आहे परीक्षेचे वेळापत्रक?
15 जुलै 2024 – सामाजिक शास्र पेपर
16 जुलै 2024 – हिंदी कोर्स-A, हिंदी कोर्स-B चा पेपर
18 जुलै 2024 – विज्ञान पेपर
19 जुलै 2024 – मॅथेमेटिक्स स्टॅंडर्स, मॅथेमेटिक्स बेसिकचा पेपर
20 जुलै 2024 – इंग्रजी (कम्युनिकेटिव), इंग्रजी (लिट्रेचर) पेपर
22 जुलै 2024 – उर्दू कोर्स – A, पंजाबीचा पेपर
किती गुणांना पास?
सीबीएसई बोर्डाची इयत्ता 10 वी आणि 12 वीची कंपार्टमेंट परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात आणि एकूण 33 टक्के गुणांची आवश्यकता असेल. तुमच्या पुनर्संबंधित विषयात किमान गुणांपेक्षा कमी गुण मिळाल्यास विद्यार्थी नापास मानले जातील. अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत पुढील वर्गात प्रवेश मिळणार नाही. ही परीक्षा झाल्यानंतर तिचे मार्कशीट विद्यार्थी त्यांच्या संबंधित शाळांमधून मिळवू शकणार आहे.