फोटो सौजन्य - Social Media
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) आणि अधीक्षक (Superintendent) पदांच्या भरतीसाठी Answer Key अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 212 पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवार cbse.gov.in या वेबसाइटवर जाऊन त्यांच्या परीक्षा Answer Key पाहू शकतात.
अधीक्षक (Superintendent) पदासाठी 142 जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) पदासाठी 70 जागा रिकाम्या आहेत. किमान १२वी उत्तीर्ण उमेदवार कनिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज करू शकतात. अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्या. त्यानुसार, उमेदवारांच्या वयोमर्यादेचा विचार 1 जानेवारी 2025 या तारखेवर आधारित आहे. या भरतीसाठी कमाल वय ३० वर्षे आयु असून २७ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येऊ शकते. सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
अर्ज करताना उमेदवारांना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. सामान्य / ओबीसी / आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹800 रक्कम भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही आहे. फी भरण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन आहे.
CBSE कनिष्ठ सहाय्यक आणि अधीक्षक भरतीसाठी तीन टप्प्यांत निवड केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा (Tier-1 आणि Tier-2) घेण्यात येईल. ही बहुपर्यायी प्रश्नांची असते आणि गुणवत्ता तपासण्यासाठी घेण्यात येते. यांनतर मूळ कागदपत्रांची पडताळणी (Document Verification)साठी उमेदवारांना आमंत्रित केले जाईल. तिसऱ्या म्हणजे अंतिम टप्प्यात वैद्यकीय तपासणी (Medical Examination) घेण्यात येईल. अंतिम टप्प्यात उमेदवाराची शारीरिक आणि वैद्यकीय स्थितीची चाचणी केली जाते.
CBSE च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन “Recruitment” विभागात आपला लॉगिन वापरून उत्तरतालिका डाउनलोड करता येईल. उमेदवारांनी उत्तरतालिका काळजीपूर्वक तपासून आपले उत्तरपत्रक आणि उत्तरतालिकेतील नोंदी तुलना कराव्यात. ही भरती प्रक्रिया पारदर्शक असून केंद्रीय शैक्षणिक प्रशासनात नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालवता आपली उत्तरतालिका तपासावी आणि आपली तयारी पुढील टप्प्यासाठी सुरू ठेवावी.