Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Walk-in Interview 2026: BAMS आणि लाइफ सायन्सेस पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; वेतनही उत्तम मिळणार

RRAP CARI Walk-in Interview 2026: नवी दिल्लीच्या CCRAS अंतर्गत मुंबईतील वरळी येथील केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेत कंत्राटी तत्त्वावर SRF पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या थेट मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 30, 2026 | 11:58 AM
interview

interview

Follow Us
Follow Us:

RRAP CARI Walk-in Interview 2026: नवी दिल्लीच्या सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस (CCRAS) अंतर्गत मुंबईतील वरळी येथील राजा रामदेव आनंदीलाल पोदार (RRAP) केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेत विविध संशोधन प्रकल्पांसाठी कंत्राटी तत्त्वावर पदे भरण्यात येणार आहेत. वर्ष २०२६-२७ साठी सुरू असलेल्या डब्ल्यूएचओ-सीसीआरएएस (WHO-CCRAS) सहयोगी संशोधन प्रकल्प आणि इतर अंतर्गत संशोधन प्रकल्पांसाठी ही भरती केली जात आहे.

पदांचा तपशील आणि पात्रता:

सीनियर रिसर्च फेलो (मेडिकल-आयुर्वेद) या पदासाठी एकूण २ जागा भरल्या जाणार असून उमेदवराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएएमएस (BAMS) पदवी प्राप्त केली आहे. ज्या उमेदवारांकडे एमडी (आयुर्वेद) ही उच्च पात्रता आणि आयुष मंत्रालय, आयसीएमआर, सीएसआयआर किंवा डीएसटीसारख्या संस्थांच्या प्रकल्पांत संशोधनाचा अनुभव आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल.

सीनियर रिसर्च फेलो (नॉन-मेडिकल) पदासाठी १ जागा असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून लाईफ सायन्सेस (जीवन विज्ञान) मधील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबधित उमेदवार लाईफ सायन्सेसमधील मास्टर डिग्री आणि क्लिनिकल रिसर्चचा अनुभव असलेला असावा.

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार

या दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षांपर्यंत असावे. (भारत सरकारच्या नियमांनुसार एससी/एसटी/ओबीसी उमेदवारांना वयात शिथिलता मिळेल).

मानधन आणि मुलाखतीची माहिती:

सीनियर रिसर्च फेलो (मेडिकल) पदासाठी संस्थेच्या नियमानुसार एकत्रित मानधन दिले जाईल, तर सीनियर रिसर्च फेलो (नॉन-मेडिकल) पदासाठी दरमहा ४२,००० रुपये अधिक ३० टक्के एचआरए (HRA) दिला जाईल. या पदांसाठी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पात्र उमेदवाराची निवड होईल.

मुलाखतीचे ठिकाण: सीसीआरएएस – राजा रामदेव आनंदीलाल पोदार (आर.आर.ए.पी) केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था, पोदार मेडिकल कॅम्पस, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – ४०००१८.

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि स्व-सत्यापित छायाप्रतींसह थेट मुलाखतीसाठी निर्धारित वेळी आणि पत्त्यावर उपस्थित राहावे. अर्जाचा नमुना परिषदेच्या www.ccras.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.

Web Title: Ccras mumbai srf recruitment walk in interview 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Contract Basis Job
  • Interview for Jobs
  • Job

संबंधित बातम्या

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार
1

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर
2

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?
3

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..
4

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.