फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IIM Mumbai Recruitment 2026: भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) मुंबईने विविध शैक्षणिक विभाग आणि कार्यक्रमांसाठी ‘ॲकॅडेमिक असोसिएट’ पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर २०२६ आहे.
या भरती मोहिमेत एकूण १५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
वयोमर्यादा: अर्जाच्या अंतिम तारखेनुसार उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्षे असावे. मात्र, पीएच.डी. धारक किंवा संबंधित अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी वय ३५ वर्षांपर्यंत शिथिल केले जाऊ शकते.
स्टायपेंड: पोस्ट-ग्रॅजुएट उमेदवारांसाठी दरमहा ४५,००० ते ५५,००० रुपये आणि पीएच.डी. पदवी धारकांसाठी दरमहा ६०,००० ते ७०,००० रुपये मानधन दिले जाईल.
इतर भत्ते: यात दरमहा ८,००० रुपये घरभाडे भत्ता, २,००० रुपये प्रवास भत्ता आणि ५०० रुपये मोबाईल रिचार्जसाठी दिले जातील.
इच्छुक उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत वेबसाइट (https://iimmumbai.ac.in/careers) वर जाऊन १३ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. निवडीची प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.






