राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! 'कमवा आणि शिका' योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू
स्त्री शिक्षण या मुद्द्यासाठी राज्य शासन नेहमीच अग्रेसर राहिला आहे. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील मुलींच्या शिक्षणाबद्दल फार महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय विद्यार्थिनींच्या हिताचा आहे. मुळात, या योजनेचे नाव ‘कमवा आणि शिका’ असे असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीचा पाठपुरावा करण्यात आला आहे.
नक्की काय आहे ‘कमवा आणि शिका’ ही योजना?
‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत, राज्यातील विद्यार्थिनींना शिक्षण घेत असताना कमावण्याची संधी मिळणार आहे. त्यांना त्यांच्या महाविद्यालयातून रोजगार प्राप्ती होणार आहे आणि त्यांचा शैक्षणिक मूलभूत खर्च निघावा म्हणून राज्य सरकारकडून दरमहा दोन हजार रुपये मिळणार आहेत. सुरुवातीला राज्यातील पाच लाख मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी दरमहा 100 कोटी रुपयांची तरतूद असणे आवश्यक आहे. या निधीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.
‘कमवा आणि शिका’ या योजने करिता एकूण 1000 कोटींचा वार्षिक निधी असणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावाही करण्यात आला आहे. परंतु राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता तो निधी मंजूर होण्यास काही काळ जाण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत आम्ही काम करू याची खात्री राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिली आहे.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली विद्यार्थिनींना निर्वाह भत्ताही देण्यात येत आहे. या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थिनींना 6000 रुपये मासिक भत्ता म्हणून देण्यात येतो जेणेकरून त्यांचा जेवण खर्च तसेच राहण्याचा भाडा निघावा. ‘कमवा आणि शिका’ या योजनेचा लाभ विद्यार्थिनींना नक्कीच होणार आणि त्यासाठी प्रयत्नशील असण्याची ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या