Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आरोग्य भरतीत स्थानिक वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांनाच प्रथम प्राधान्य द्या…”, डॉ. सूर्यवंशी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

आरोग्य भरतीत स्थानिक वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांनाच प्रथम प्राधान्य द्या, अशी मागणी भीम पँथर संघटनेचे अध्यक्ष डॉ. सूर्यवंशी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 20, 2026 | 05:44 PM
"आरोग्य भरतीत स्थानिक वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांनाच प्रथम प्राधान्य द्या...", डॉ. सूर्यवंशी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी (फोटो सौजन्य-Gemini)

"आरोग्य भरतीत स्थानिक वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांनाच प्रथम प्राधान्य द्या...", डॉ. सूर्यवंशी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:

धाराशिव : जिल्ह्यातील आरोग्य विभागांतर्गत होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती प्रक्रियेत भारतीय विद्यापीठांतून उत्तीर्ण झालेल्या वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. अशी आग्रही मागणी भीम पँथर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रतीक सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. परदेशातील वैद्यकीय शिक्षण आणि भारतातील अत्यंत कठीण परीक्षा पद्धती यांची तुलना करणे अन्यायकारक असून, स्थानिक गुणवत्तेला डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे.

भारतीय विद्यार्थ्यांच्या कष्टांची दखल घेण्याची गरज

डॉ. सूर्यवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे की, भारतातील विद्यार्थी अत्यंत कठीण अशी ‘एनइइट’ परीक्षा उत्तीर्ण होऊन, गुणवत्तेच्या जोरावर शासकीय किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवतात. साडेपाच वर्षांचा कठोर अभ्यास आणि भारतातील कडक परीक्षा पद्धती पार करून ते ही पदवी संपादन करतात. याउलट, परदेशातील (एफएमजी) अनेक विद्यापीठांमधील परीक्षा पद्धती आणि गुणांकन पद्धती भारतातल्या तुलनेत अत्यंत वेगळी असते. केवळ गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी लावल्यास भारतीय पदवीधारकांवर मोठा अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Sahyadri Tiger Reserve: आंबोलीच्या देवराईत वाघाचे दर्शन! ७-८ फुटांवर वाघ…; रोमांचकारी अनुभव कॅमेऱ्यात कैद

आंतरराष्ट्रीय निकषांचा दिला दाखला

अमेरिका, इंग्लंड यांसारखे प्रगत देश भारतीय डॉक्टरांना नोकरी देताना अत्यंत कठीण निकष आणि परीक्षा लावतात. मग आपल्याकडे स्थानिक पदवीधारकांऐवजी परदेशी पदवीधारकांना समान किंवा अधिक प्राधान्य देणे हे आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कष्टांची अवहेलना करणारे आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

असा असावा प्राधान्यक्रम

प्रथम प्राधान्य भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांतून वैद्यकीय एमबीबीएस पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात यावे. द्वितीय प्राधान्य भारतीय पदवीधारक बीएएमएस विद्यार्थ्यांना देण्यात यावे. तर तृतीय प्राधान्य परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात यावे. अशी मागणी करत, आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आणि स्थानिक गुणवत्तेला न्याय देण्यासाठी हे प्राधान्यक्रम ठरवण्याची मागणी भीम पँथर संघटनेने केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या 1,440 जागांसाठी मोठी भरती (२०२५) जाहीर करण्यात आली होती. यात एमबीबीएस (MBBS) किंवा पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना अर्ज करता येईल। याशिवाय, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि मुंबई महानगरपालिकेतही कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रिया होती.

मुंबई विभाग दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

Web Title: Give first priority in health recruitment to local medical mbbs graduates dr suryavanshi request to the district collector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Dharashiv
  • MBBS
  • Student

संबंधित बातम्या

CBSE 12th Re-evaluation Result: तब्बल ३.८ लाख उत्तरपत्रिकांची होणार तपासणी; ‘या’ दिवशी लागणार १२ वीचा सुधारित निकाल!
1

CBSE 12th Re-evaluation Result: तब्बल ३.८ लाख उत्तरपत्रिकांची होणार तपासणी; ‘या’ दिवशी लागणार १२ वीचा सुधारित निकाल!

School Reopening : शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; उष्णतेमुळे पालक चिंतेत; आरोग्याला धोका होण्याची भीती
2

School Reopening : शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; उष्णतेमुळे पालक चिंतेत; आरोग्याला धोका होण्याची भीती

Maharashtra Rain Update : धाराशिवमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; ८ जूनपर्यंत अपेक्षेपेक्षा दुप्पट पावसाची नोंद
3

Maharashtra Rain Update : धाराशिवमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; ८ जूनपर्यंत अपेक्षेपेक्षा दुप्पट पावसाची नोंद

Dharavi Project: आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट; 1 लाख 25 हजार घरांसह पुनर्वसनाचा महाप्लॅन
4

Dharavi Project: आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट; 1 लाख 25 हजार घरांसह पुनर्वसनाचा महाप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.