Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केमिकल की बायोकेमिकल? अभियांत्रिकीच्या कोणत्या क्षेत्रात करावे करिअर? जाणून घ्या सविस्तर

Chemical and Biochemical Engineering मध्ये जीवसृष्टीवर आधारित प्रक्रिया समजून घेणे आणि त्यावर काम करणे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 21, 2025 | 06:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • जीवसृष्टीवर आधारित प्रक्रिया समजून घेणे आणि त्यावर काम करणे हे या कोर्सचे वैशिष्ट्य
  • बायोप्रोसेस इंजिनिअर, क्वालिटी कंट्रोल अ‍ॅनालिस्ट, R&D प्रोफेशनल अशी पदे येथे उपलब्ध
  • स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्येही या कोर्सना मोठी मागणी
भारतामध्ये इंजिनिअरिंग हे करिअरसाठी नेहमीच विद्यार्थ्यांची पहिली पसंती राहिली आहे. पूर्वी इंजिनिअरिंगच्या केवळ ५–६ प्रमुख शाखा उपलब्ध होत्या. मात्र, उद्योगक्षेत्रातील बदलती गरज, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज ४० पेक्षा अधिक प्रकारचे इंजिनिअरिंग कोर्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे आता दोन किंवा अधिक विषयांचे एकत्रित ज्ञान देणारे इंटरडिसिप्लिनरी कोर्सही मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर BTech in Chemical Engineering आणि BTech in Chemical and Biochemical Engineering हे दोन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे पर्याय ठरत असून अनेक विद्यार्थी यामध्ये संभ्रमात पडतात.

Buldhana News: निर्धारित क्षेत्रापैकी ८२ टक्के रब्बी पेरणी पूर्ण; हरभरा, गहू पिकांना शेतकऱ्यांची पसंती

Chemical Engineering म्हणजे काय?

BTech in Chemical Engineering हा पारंपरिक आणि दीर्घ इतिहास असलेला अभ्यासक्रम आहे. भारतात हा कोर्स १९२१ पासून शिकवला जातो. या अभ्यासक्रमामध्ये कच्च्या मालाचे सुरक्षित, कार्यक्षम आणि आर्थिक पद्धतीने उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर कसे करायचे, याचे सखोल ज्ञान दिले जाते. केमिस्ट्री, गणित, थर्मोडायनॅमिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स आणि प्रोसेस इंजिनिअरिंग या विषयांची भक्कम पायाभरणी या कोर्समध्ये केली जाते.

Chemical and Biochemical Engineering म्हणजे काय?

BTech in Chemical and Biochemical Engineering हा तुलनेने नवा अभ्यासक्रम आहे. यात केमिकल इंजिनिअरिंगसोबत बायोलॉजीचा समावेश केला जातो. या कोर्सचा मुख्य भर फार्मास्युटिकल्स, बायोटेक्नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग, बायोफ्युएल्स आणि पर्यावरणाशी संबंधित जैव-आधारित प्रक्रियांवर असतो. जीवसृष्टीवर आधारित प्रक्रिया समजून घेणे आणि त्यावर काम करणे हे या कोर्सचे वैशिष्ट्य आहे.

अभ्यासक्रमात काय शिकवले जाते?

Chemical Engineering मध्ये मास ट्रान्सफर, हीट ट्रान्सफर, रिऍक्शन इंजिनिअरिंग, प्रोसेस कंट्रोल, प्लांट डिझाईन यांसारखे विषय शिकवले जातात. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या उद्योगांसाठी सुरक्षित आणि कार्यक्षम प्रक्रिया विकसित करणे हा या कोर्सचा मुख्य उद्देश असतो. Chemical and Biochemical Engineering मध्ये यासोबतच मायक्रोबायोलॉजी, एन्झायमोलॉजी, फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी, मेटाबोलिक इंजिनिअरिंग आणि बायोप्रोसेस डिझाईन यांवर विशेष भर दिला जातो. येथे स्वच्छता, नियंत्रित वातावरण आणि जीवसृष्टीशी निगडित संवेदनशील प्रक्रिया महत्त्वाच्या असतात.

करिअरच्या संधी

Chemical Engineering पदवीधरांना पेट्रोकेमिकल, रिफायनरी, खतनिर्मिती, पॉलिमर, प्लास्टिक, ऊर्जा, गॅस आणि फूड प्रोसेसिंग उद्योगांमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात. प्रोसेस इंजिनिअर, प्रोडक्शन इंजिनिअर, प्लांट इंजिनिअर, सेफ्टी इंजिनिअर अशी पदे मिळू शकतात. Chemical and Biochemical Engineering करणाऱ्या विद्यार्थ्यांना बायोफार्मा, लस निर्मिती, बायोफ्युएल्स, फर्मेंटेशन इंडस्ट्री, पर्यावरण बायोटेक्नॉलॉजी आणि संशोधन प्रयोगशाळांमध्ये संधी मिळतात. बायोप्रोसेस इंजिनिअर, क्वालिटी कंट्रोल अ‍ॅनालिस्ट, R&D प्रोफेशनल अशी पदे येथे उपलब्ध असतात.

कोणता कोर्स निवडावा?

जर तुम्हाला गणित, भौतिकशास्त्र आणि मोठ्या औद्योगिक यंत्रणांशी काम करायला आवडत असेल, तर Chemical Engineering हा अधिक व्यापक आणि सुरक्षित पर्याय ठरतो. मात्र, जर बायोलॉजी, संशोधन आणि फार्मा-बायोटेक क्षेत्रात करिअर करायची इच्छा असेल, तर Chemical and Biochemical Engineering तुमच्यासाठी योग्य ठरेल.

IOCL मध्ये ३९४ ज्युनियर इंजिनिअर पदांची भरती; ‘या’ तारखेपासून करता येईल अर्ज

कोर्स कुठे करता येतील?

हे दोन्ही अभ्यासक्रम IITs, NITs, Institute of Chemical Technology (ICT), VIT यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच अमेरिका, युनायटेड किंगडम, नेदरलँड्स आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्येही या कोर्सना मोठी मागणी आहे.

Web Title: Chemical or biochemical which field of engineering should you choose for your career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • National Engineers Day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.