Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Meeting on MPSC: MPSC विद्यार्थ्यांच्या विजयाचा एल्गार! शासनाकडून मागण्या मान्य, आंदोलनाबाबत मोठा निर्णय

CM Meeting on MPSC: मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. एमपीएससीच्या सचिवांची बदली, न्यायालयीन चौकशी आणि सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 06, 2026 | 10:08 AM
mpsc

mpsc

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येणार
  • एमपीएससी सचिवांची बदली होणार आणि परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार
  • एमपीएससी अध्यक्षांना पदावरून सध्या हटवले जाणार नाही
  • सर्व विक्रम मोडित मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जाणार
CM Meeting on MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीतील त्रुटी, पेपरफुटीचे आरोप आणि निकालातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या मागण्यांसाठी पुण्यात २ ऑक्टोबरपासून पुकारण्यात आलेले बेमुदत धरणे व नियोजित आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

एमपीएससीच्या सचिवांची तत्काळ बदली केली जाणार

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची ३ महिन्यांच्या आत न्यायालयीन चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, तसेच एमपीएससीच्या सचिवांची तत्काळ बदली केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय आगामी सर्व परीक्षा या पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील आणि आजवरचे सर्व विक्रम मोडत मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा भरल्या जातील, असा शब्दही सरकारने दिला आहे.

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

एमपीएससी अध्यक्षांना पदावरून सध्या हटवले जाणार नाही

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एकाच ‘सिंगल कार्ड’वर माफक दरात सर्व परीक्षा देता याव्यात आणि वारंवार कागदपत्रे सादर करावी लागू नयेत, अशी यंत्रणा विकसित केली जाणार आहे. दरम्यान, एमपीएससी अध्यक्षांचे पद हे घटनात्मक असल्याने त्यांना हटवण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे असल्यामुळे त्या मुद्द्यावर तूर्त निर्णय होऊ शकला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. असे असले तरी, शासनाकडून बहुतांश मागण्या मान्य झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पुण्यात होणारे आंदोलन तूर्त मागे घेत असल्याचे जाहीर केले.

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

Web Title: Cm meeting on mpsc students agitation suspended cm meeting marathi news sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • competitive exam
  • MPSC

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
1

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस
2

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस

MPSC Protest: ‘एका परीक्षेमुळे आयुष्य…..’; आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीत सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके भावूक
3

MPSC Protest: ‘एका परीक्षेमुळे आयुष्य…..’; आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीत सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके भावूक

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
4

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.