Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रम! ‘हे’ कोर्स कराल तर उत्तम भवितव्य घडवाल, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएसशिवाय अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नर्सिंग, फिजिओथेरपी, फार्मसी, स्पीच थेरपी, ऑप्टोमेट्री यांसारख्या कोर्समधून करिअर करता येते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 21, 2026 | 03:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी केवळ एमबीबीएस हाच पर्याय नसून अनेक विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, रेडिओग्राफी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, ऑप्टोमेट्री, नर्सिंग आणि पॅरामेडिकल अशा क्षेत्रांमध्ये विद्यार्थी तांत्रिक तज्ज्ञ म्हणून करिअर करू शकतात. एमबीबीएससारख्या अभ्यासक्रमाला साडेचार ते सात वर्षे लागतात, तर इतर अनेक कोर्सेस दोन ते चार वर्षांत पूर्ण होऊन लवकर नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.

एसव्हीव्हीएनएस विद्यार्थ्यांचे दहावीत दमदार यश, शाळेच्या गुणवत्तेची पुन्हा छाप; प्रथमेश पाटील 98.40 टक्क्यांसह अव्वल

नर्सिंग क्षेत्रात डिप्लोमा आणि डिग्री असे दोन्ही प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. बीएससी नर्सिंग, पोस्ट सर्टिफिकेट कोर्सेसद्वारे हॉस्पिटल, नर्सिंग होम तसेच परदेशातही चांगल्या संधी मिळतात. फिजिओथेरपीमध्ये शारीरिक व्यायाम आणि हालचालींच्या मदतीने रुग्णांचे पुनर्वसन केले जाते. या क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम साधारण साडेचार वर्षांचा असतो आणि सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात.

ऑप्थेल्मिक टेक्नॉलॉजीमध्ये डोळ्यांची तपासणी करणाऱ्या आधुनिक उपकरणांचा वापर शिकवला जातो. १२वी नंतर डिप्लोमा करून या क्षेत्रात काम करता येते. फार्मसीमध्ये डी. फार्मसी किंवा बी. फार्मसी करून फार्मासिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट अशा विविध पदांवर काम करता येते. या क्षेत्रातही प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आवश्यक असते.

स्पीच थेरपी हा मूकबधिर किंवा बोलण्यात अडचण असलेल्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा कोर्स आहे. बीएससी इन स्पीच थेरपी हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असून यामध्ये संवाद कौशल्य सुधारण्याचे प्रशिक्षण दिले जाते. डायटेटिक्स आणि न्यूट्रिशन या क्षेत्रात आहारतज्ज्ञ म्हणून करिअर करता येते. हॉस्पिटल, फिटनेस सेंटर, हॉटेल्स याठिकाणी या तज्ज्ञांची मागणी वाढत आहे.

दोन लाख विद्यार्थी देणार पीसीबी सीईटी परीक्षा! होणार दोन परीक्षा, विद्यार्थ्यांना मिळणार एक संधी आणखीन

पॅरामेडिकल क्षेत्रात रेडिओग्राफी, लॅब टेक्नॉलॉजी यांसारखे कोर्सेस येतात. सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्री स्तरावर हे अभ्यासक्रम उपलब्ध असून डॉक्टरांच्या सहाय्यक म्हणून काम करता येते. तसेच पब्लिक हेल्थ संस्था आणि संशोधन केंद्रांमध्येही संधी मिळते. हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते आणि खासगी रुग्णालयांमध्ये व्यवस्थापक म्हणून करिअर करता येते. एकूणच, वैद्यकीय क्षेत्रात विविध पर्याय उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी आणि क्षमतेनुसार योग्य कोर्स निवडल्यास कमी कालावधीत स्थिर आणि समाधानकारक करिअर घडवता येते.

Web Title: Courses in the medical field pursue these courses to build an excellent future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Medical
  • Medical Hospital

संबंधित बातम्या

परदेशी वैद्यकीय पदवीधारकांसाठी मोठी बातमी! FMGE Exam २०२६ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज..
1

परदेशी वैद्यकीय पदवीधारकांसाठी मोठी बातमी! FMGE Exam २०२६ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज..

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……
2

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……

Parbhani Medical College: डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार!
3

Parbhani Medical College: डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.