संग्रहित फोटो
पिंपरी : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत तळवडे येथील सरस्वती युनिव्हर्सिटी नॅशनल स्कूल (एसव्हीव्हीएनएस)च्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली गेली आहे. निकालात प्रथमेश पाटील याने ९८.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सम्यक संबुद्ध (९८ टक्के) याने द्वितीय, तर आदित्य गाडेकर (९६.६० टक्के) याने तृतीय क्रमांक मिळवला. निल बढे आणि पृथ्वी रावण यांनी प्रत्येकी ९६.४० टक्के गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
याशिवाय फिओना सिजू (९५.८० टक्के), स्तुती भंगाळे (९५.६० टक्के) आणि धैर्य शिंदे (९५.४० टक्के) यांनीही उल्लेखनीय यश मिळवत शाळेच्या निकालात भर घातली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, सचिव सरस्वती नायर, संचालिका डॉ. स्मिता नायर-कुरूप तसेच मुख्याध्यापिका डॉ. क्षमा गर्गे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निकालामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, एसव्हीव्हीएनएस शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.
हे सुद्धा वाचा : वित्तीय समिती बंद करणार नाही; पुणे महापालिका आयुक्तांनी थेट नगरसेवकांनाच ठणकावले
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
ज्यातील अकरावी प्रवेशासाठी १० एप्रिलपासून सुरू झालेल्या केंद्रीय ऑनलाइन पध्दतीचा अवलंब केला असून, अर्ज नोंदणीला प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच दोन लाख ६० हजार ५९५ हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्जाच्या ‘भाग-एक’ साठी नोंदणी केली आहे. यंदा प्रवेश प्रक्रिया वेळेआधी सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आणि महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची निवड करणे यासाठी अधिक कालावधी उपलब्ध झाला आहे. राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीला यंदाही प्राधान्य देण्यात आले असून विद्यार्थ्यांनी अधिकृत https://mahafyjcadmissions.in/. संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज अचूक भरता यावा यासाठी शाळांच्या माध्यमातून मार्गदर्शनावर भर देण्यात येत आहे. याशिवाय विविध शाळांमध्ये मार्गदर्शक केंद्रे उभारण्यात येत असून हेल्पलाइनद्वारेही विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसोबत विविध कोटा अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारे महाविद्यालयांची पसंती नोंदविता येणार आहे.






