Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day: पतंगबाजी ते ८० किमी सायकल रायडिंग; दिल्लीत स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची पद्धत कशी बदलली?

Independence Day 2026: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत पतंग आणि पेच फेस्टिव्हल, ८० किमी फ्रीडम सायकल राइड आणि बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील या बदलाचा सविस्तर आढावा जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 15, 2026 | 09:24 AM
independence day

independence day

Follow Us
Follow Us:

Independence Day 2026: जुन्या दिल्लीचे चैतन्य, इतिहास जपणारे आणि पतंगांनी सजलेले रस्ते, तसेच हवेत दरवळणारा अस्सल खाद्यपदार्थांचा सुगंध या सर्वांसह दिल्लीत आजही स्वातंत्र्याचा तोच जुना अंदाज जिवंत आहे. चांदणी चौक, खारी बावलीपासून ते लालकुआं येथील बाजारपेठांमध्ये १५ ऑगस्टनिमित्त भरणारा पतंगांचा मेळावा आजही तितक्याच उत्साहात भरतो.

दिल्लीमध्ये १५ ऑगस्टला पतंगांच्या रंगांनी संपूर्ण आकाश उजळून निघते आणि जामा मशिदीच्या छतांवर जलोषाचे एक वेगळेच दृश्य पाहायला मिळते. दिल्लीत स्वातंत्र्यदिन हा केवळ एक सण नाही, तर पतंगांची दोर आणि आनंदाच्या नव्या ऊर्जेसोबत साजरा केला जाणारा एक अटूट अनुभव आहे.

भारताच्या स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. या वर्षी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषण आधी ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गायले. दिल्लीच्या ८० वर्षांतील स्वातंत्र्योत्सवाच्या प्रवासावर नजर टाकल्यास, स्वातंत्र्य साजरे करण्याच्या पद्धतींमध्ये काळाच्या ओघात अनेक मोठे बदल झाले आहेत. पतंगबाजीच्या परंपरेपासून ते बाइक रायडिंगच्या आधुनिक संस्कृतीपर्यंतचा हा प्रवास अत्यंत खास राहिला आहे.

८० वर्षांत कशी बदलली स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची पद्धत?

दिल्लीत स्वातंत्र्याचा उत्सव केवळ लाल किल्ल्याच्या तटापुरता मर्यादित राहत नाही, तर येथील आकाशही रंगीबेरंगी पतंगांनी सजून एक वेगळेच रूप धारण करते. १५ ऑगस्टच्या दिवशी बहुतांश दिल्लीकर आपापल्या छतांवर हातात मांजा आणि पतंग घेऊन ‘वो काट’ च्या जल्लोषात हा सण साजरा करताना दिसतात. या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जुन्या दिल्लीतील याच आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी ‘पतंग आणि पेच फेस्टिव्हल २०२६’ चे विशेष आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात नामांकित इतिहासकार आणि लेखिका राना सफवी सहभागी होणार असून, त्या दिल्लीचा इतिहास, पतंगबाजीची संस्कृती आणि स्वातंत्र्याची भावना यांचा परस्परांशी असलेला खोल संबंध स्पष्ट करतील.

UPSC Success Story: KBC मध्ये ५० लाख जिंकल्यानंतर विकासने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा कशी क्रॅक केली? जाणून घ्या

सायकलपटू अनोख्या पद्धतीने साजरा करणार स्वातंत्र्यदिन

भारताची राजधानी दिल्लीतील सायकलपटू देखील १५ ऑगस्टचा सण अत्यंत खास पद्धतीने साजरा करणार आहेत. ‘फ्रीडम ८० राइड’ या उपक्रमात सहभागी होऊन तब्बल ८० किलोमीटर सायकल चालवून हे सायकलपटू आपल्या दिवसाची सुरुवात करतील. केवळ दिल्लीच नव्हे, तर इतर अनेक शहरांतील सायकलपटूही १५ ऑगस्टला ८० किलोमीटरच्या राइडसह स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतील. या वेळी स्वातंत्र्यदिनाचा हा उत्साह केवळ राजधानीपुरता मर्यादित न राहता शहराच्या सीमांच्या पार पोहोचणार आहे.

Study in Australia: १२ वी नंतर ऑस्ट्रेलियात हवी आहे त्वरित नोकरी? ‘हा’ शॉर्ट टर्म कोर्स ठरू शकतो गेमचेंजर!

बाइक रायडिंगच्या थरारासह स्वातंत्र्याचा जल्लोष

मोटारसायकलवर फडकणारा तिरंगा, वाऱ्याचा वेग आणि बाइक रायडर्सच्या टोळ्यांचा उत्साह या वेळी ८० व्या स्वातंत्र्योत्सवात रंग भरणार आहे. हा विशेष उत्सव १५ ऑगस्टला नव्हे, तर १६ ऑगस्ट रोजी ५०० बाइक्सच्या ताफ्यासह साजरा केला जाईल. दिल्लीपासून सुरू होणारी ही ५० किलोमीटरची राइड मुरथलपर्यंत जाईल. यामुळे देशभक्तीचा जयघोष ५० किलोमीटरच्या पट्ट्यात गुंजणार आहे. हे आयोजन म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि ज्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी योगदान दिले, त्यांच्या बंधुभावाला आणि त्यागाला दिलेली एक अनोखी श्रद्धांजली असल्याचे या रायडर्सचे म्हणणे आहे.

Web Title: Delhi independence day 2026 kite festival freedom ride marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • bike
  • freedom fighters
  • Independence Day 2026
  • indian festival

संबंधित बातम्या

Independence Day Medals 2026: स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्राचा बहुमान! ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर
1

Independence Day Medals 2026: स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्राचा बहुमान! ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

Independence Day: आज भारताचा स्वातंत्र्यदिन; जाणून घ्या १५ ऑगस्टचा इतिहास..
2

Independence Day: आज भारताचा स्वातंत्र्यदिन; जाणून घ्या १५ ऑगस्टचा इतिहास..

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती
3

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

तीन रंगांची ही कथा…! स्वातंत्र्यदिनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि प्रियजनांना पाठवा देशभक्तीपर मराठमोळ्या शुभेच्छा
4

तीन रंगांची ही कथा…! स्वातंत्र्यदिनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि प्रियजनांना पाठवा देशभक्तीपर मराठमोळ्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.