Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली विद्यापीठात विदयार्थी संघांच्या निवडणुका! निकाल जाहीर, ABVP आघाडीवर

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ (DUSU) निवडणुकीत ABVP ने अध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव पदांवर विजय मिळवला, तर NSUI ला फक्त उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 19, 2025 | 06:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (DUSU) निवडणुकीत यंदा RSSशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने मोठा विजय मिळवला आहे. शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी घोषित झालेल्या निकालानुसार एबीव्हीपीने अध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव हे तीन पदे जिंकली, तर एनएसयूआय (NSUI) ला केवळ उपाध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत NSUI कडे दोन पदे होती, परंतु यंदा त्यांचा अध्यक्षपद गमावल्याने नुकसान झाले आहे.

राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेच्या कार्यशाळेचे आयोजन! मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उदघाटन

निकालाचा आढावा

अध्यक्षपदावर ABVP च्या आर्यन मान यांनी 28,841 मते मिळवून विजय मिळवला. उपाध्यक्षपदावर NSUI चे राहुल यादव झांसल यांनी सर्वाधिक 29,339 मते मिळवून विजय मिळवला. सचिवपदी ABVP चे कुणाल चौधरी यांनी 23,779 मते, तर संयुक्त सचिवपदी दीपिका झा यांनी 21,825 मते मिळवून यश संपादन केले. दुसरीकडे, NSUI चे अध्यक्षपदाचे उमेदवार जोसलिन नंदिता चौधरी यांना फक्त 12,645 मते मिळाली. सचिव पदावर कबीर (16,177 मते) आणि संयुक्त सचिव पदावर लवकुश भडाना (17,380 मते) पराभूत झाले.

इतर संघटनांचे प्रदर्शन

SFI-आयसा आघाडीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. अध्यक्षपदासाठी त्यांना 5,385 मते मिळाली, तर उपाध्यक्ष पदावर 4,163 मते, सचिव पदावर 9,535 मते आणि संयुक्त सचिव पदावर 8,425 मते मिळाली.

2024 च्या तुलनेत बदल

मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये NSUI ने अध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदावर विजय मिळवला होता. त्या वेळी रौनक खत्री अध्यक्ष झाले होते आणि लोकेश चौधरी संयुक्त सचिव झाले होते. तर ABVP कडे उपाध्यक्ष आणि सचिव पद होते. मात्र, यंदा समीकरण पूर्णपणे बदलले आहे.

विजेत्यांची प्रतिक्रिया

विजयानंतर ABVP च्या दीपिका झा यांनी सांगितले की, “मी बिहारहून दिल्लीला आली आणि कठोर मेहनत केली. विद्यार्थ्यांनी माझ्या संघर्षाला पाठिंबा दिला आणि मी 4,000 मतांच्या फरकाने जिंकले. सर्वांचे आभार.” तर पराभवाबद्दल NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “NSUI ने असमान लढाई लढली. आमचा संघर्ष फक्त ABVP विरुद्ध नव्हता, तर विद्यापीठ प्रशासन, केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि RSS-BJP यांच्या एकत्रित ताकदीविरुद्ध होता. हजारो विद्यार्थ्यांनी आमच्यासोबत उभे राहून समर्थन दिले.” त्यांनी आरोप केला की EVMमध्ये गडबड करून आणि निवडणूक समितीच्या प्राध्यापकांचा गैरवापर करून निकालावर परिणाम करण्याचा प्रयत्न झाला.

प्रोफेसर पदासाठी करता येईल अर्ज! वेळ दवडू नका, ताबडतोब करा अर्ज, व्हा नियुक्त

या निवडणुकीत ABVP ने स्पष्ट आघाडी घेतली असून NSUI ला मोठा धक्का बसला आहे. तरीदेखील NSUI ने संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Web Title: Delhi university student union elections results declared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • delhi

संबंधित बातम्या

वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा कार अपघातात मृत्यू, रुग्णालयात नेणाऱ्या व्हॅन चालकाचा धक्कादायक खुलासा
1

वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा कार अपघातात मृत्यू, रुग्णालयात नेणाऱ्या व्हॅन चालकाचा धक्कादायक खुलासा

Gyan Bharatam Portal Launch: प्राचीन भारतीय ज्ञान आता एका क्लिकवर; पंतप्रधान मोदींनी ‘ज्ञान भारतम्’ पोर्टल केले लाँच
2

Gyan Bharatam Portal Launch: प्राचीन भारतीय ज्ञान आता एका क्लिकवर; पंतप्रधान मोदींनी ‘ज्ञान भारतम्’ पोर्टल केले लाँच

‘कोर्टात तीन बॉम्ब ठेवले आहे….’ धमकीच्या ईमेलनंतर दिल्ली उच्च न्यायालय रिकामे, न्यायाधीश आणि वकिलांना सुरक्षित बाहेर काढले
3

‘कोर्टात तीन बॉम्ब ठेवले आहे….’ धमकीच्या ईमेलनंतर दिल्ली उच्च न्यायालय रिकामे, न्यायाधीश आणि वकिलांना सुरक्षित बाहेर काढले

5 रुपयांच्या लिंबूने 15 लाखाच्या थारचा केला चक्काचूर; एक चूक अन् घडली आयुष्यभराची अद्दल; घटनेचा धक्कादायक Video Viral
4

5 रुपयांच्या लिंबूने 15 लाखाच्या थारचा केला चक्काचूर; एक चूक अन् घडली आयुष्यभराची अद्दल; घटनेचा धक्कादायक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.