Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhruv Rathee: मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण; जाणून घ्या ध्रुव राठीचा शिक्षणप्रवास

Dhruv Rathee: यूट्यूबवरील लोकप्रिय कंटेंट क्रिएटर ध्रुव राठी सध्या दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आला आहे. राजकारण, इतिहास आणि सामाजिक विषयांवर व्हिडिओ बनवणाऱ्या ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवासही तितकाच उल्लेखनीय आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 14, 2026 | 05:44 PM
Dhruv Rathee: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Dhruv Rathee: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. ध्रुव राठीचा यूट्यूब प्रवास २०१४ मध्ये सुरू.
  2. मेकॅनिकल इंजिनिअरिंगनंतर जर्मनीत रिन्यूएबल एनर्जीमध्ये मास्टर्स.
  3. २०२३ मध्ये TIME मॅगझीनच्या Next Generation Leaders यादीत स्थान.

Dhruv Rathee Education Qualification: दिल्लीत सध्या एकच चर्चा आहे. जंतर-मंतरवर लोक जमा झालेत. सीजेपी वाले आंदोलन करतायत. त्यांची मागणी काय तर, मुख्य निवडणूक आयुक्तांना खुर्चीवरून हटवा. ह्या सगळ्या गदारोळात अचानक ध्रुव राठीचं नाव समोर आलं.ध्रुव राठी म्हणजे कोण? तर यूट्यूबवरचा तो पोरगा, जो राजकारण, इतिहास यावर लांब लांब व्हिडिओ बनवतो. आता त्याच्याबद्दल बोललं जातंय, तर लोकांना प्रश्न पडलाय, हा शिकला तरी किती? चला, पूर्ण स्टोरी.

पहिला व्हिडिओ फिरण्याचा, आता राजकारणाचा बादशहा

आज त्याचे व्हिडिओ कोट्यवधी लोक बघतात. पण सुरुवात अशी नव्हती. सुरुवातीला तो फक्त फिरण्याचे व्हिडिओ टाकायचा. कुठे फिरायला गेला, काय बघितलं, हेच दाखवायचा.नंतर हळूहळू त्याने विषय बदलला. फिरणं सोडलं आणि राजकारण, समाजात काय चाललंय, यावर बोलायला लागला. आणि लोकांना तेच आवडायला लागलं. आता तो भारतातला सगळ्यात मोठा यूट्यूबर मानला जातो. Dhruv Rathee:

शिक्षणात पण एक नंबर

ध्रुवचं शिक्षण ऐकलं तर डोकं गरगरेल. एक-दोन डिग्री नाहीत, त्याने चांगल्या तीन-तीन डिग्री घेतल्यात.सगळ्यात आधी त्याने मॅकेनिकल इंजिनिअरिंग केलं. बॅचलर डिग्री. इंजिनिअर झाला. मग तो जर्मनीला गेला. तिथे त्याने पुढचं शिक्षण घेतलं. कार्लस्रूहे नावाचं मोठं कॉलेज आहे तिथे. त्याचं नाव KIT. तिथून त्याने रिन्यूएबल एनर्जीमध्ये मास्टर केलं. म्हणजे सौर ऊर्जा, वारा ऊर्जा, यावरचं शिक्षण.

Laptop Tips and Tricks: लॅपटॉप वापरता? मग हे ५ जादुई शॉर्टकट नक्की शिका; तासाभराचे काम होईल काही मिनिटांत!

सायन्स-टेक्नॉलॉजीसाठी ते कॉलेज जर्मनीत फार प्रसिद्ध आहे. एवढ्यावरच थांबला नाही. त्याने अजून एक बॅचलर डिग्री घेतली. ती कशात तर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात. एकीकडे इंजिनिअरिंगचं डोकं, दुसरीकडे राजकारण आणि पैशांचं ज्ञान. त्यामुळेच त्याचे व्हिडिओ असे तर्कशुद्ध वाटतात. फक्त बोलायचं म्हणून नाही बोलत, अभ्यास करून बोलतो.त्याच्या स्वतःच्या वेबसाईटवरच ही सगळी माहिती दिलीये.

iPhone वरून सुरुवात, दोन महिने एडिटिंग

गोष्ट आहे 2014 सालची. ध्रुव तेव्हा जर्मनीत शिकत होता. तेव्हा त्याने पहिला व्हिडिओ यूट्यूबवर टाकला. फिरण्याचा व्हिडिओ.तो व्हिडिओ त्याने iPhone 5s वर काढला होता. आता ऐकून हसू येईल, पण त्या एका छोट्या व्हिडिओचं एडिटिंग करायला त्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला होता. अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्वतः हे सांगितलं होतं.

MSRTC Recruitment 2026: तरुणांसाठी खुशखबर! एसटी महामंडळात 13,980 पदांची भरती जाहीर, चालकांसह यांत्रिकी पदांसाठी संधी

मग काही दिवसांनी त्याला वाटलं, नुसतं फिरणं दाखवण्यापेक्षा देशात काय चाललंय यावर बोलावं. मग 16 सप्टेंबर 2016 ला त्याने पहिला राजकीय व्हिडिओ टाकला. बस, तिथूनच त्याची खरी ओळख बनली. तेव्हापासून तो राजकारण, सरकारी योजना, इतिहासातील जुन्या गोष्टी, यावर व्हिडिओ बनवतोय.

2020 पर्यंत एकटाच सगळं करायचा

विश्वास बसणार नाही, पण 2020 पर्यंत ध्रुव सगळं काम एकटाच करायचा. माहिती शोधणं, लिहिणं, बोलणं, एडिटिंग करणं, सगळं एकटा.नंतर जेव्हा चॅनल खूप मोठं झालं, तेव्हा त्याने माणसं ठेवली. एक टीम बनवली. मग त्याचे हिंदी व्हिडिओ घराघरात पोहोचले.त्याच्या कामाची दखल जगाने पण घेतली.

2023 मध्ये TIME मॅगझीनने त्याला ‘नेक्स्ट जेनरेशन लीडर्स’ च्या यादीत टाकलं. चालू घडामोडींवर खरं-खोटं तपासून हिंदीत व्हिडिओ बनवल्याबद्दल त्याला हा मान मिळाला. म्हणूनच आज जंतर-मंतर असो किंवा निवडणूक असो, ध्रुव राठीचं नाव चर्चेत येतं.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ध्रुव राठी कोण आहे?

    Ans: ध्रुव राठी हा लोकप्रिय भारतीय यूट्यूबर असून तो राजकारण, इतिहास आणि सामाजिक विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवतो.

  • Que: ध्रुव राठीने कोणते शिक्षण घेतले आहे?

    Ans: त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग, रिन्यूएबल एनर्जीमध्ये मास्टर्स तसेच अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.

  • Que: ध्रुव राठीने जर्मनीत कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले?

    Ans: त्याने जर्मनीतील Karlsruhe Institute of Technology (KIT) येथे उच्च शिक्षण घेतले.

Web Title: Dhruv rathee education qualification mechanical engineering germany journey rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 05:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.