MSRTC Recruitment 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
एसटी महामंडळात लवकरच सुमारे १३,९८० चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
एसटीत नोकरीची वाट बघणाऱ्या पोरांसाठी एक मोठी बातमी आली. एसटी महामंडळात लवकरच 13,980 चालक आणि मेकॅनिकची भरती होणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. ही घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी केली. MSRTC Recruitment 2026:
ते म्हणाले, ‘या भरतीत कोणाच्याही फसवणुकी होणार नाही, याची पूर्ण जबाबदारी एसटी प्रशासनाची असेल.”ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी. बाह्य संस्थेमार्फत करण्यात येणारी उमेदवारांची निवड एसटी महामंडळाने निर्धारित केलेल्या पात्रता निकषांनुसारच व्हावी’, असे स्पष्ट निर्देश सरनाईक यांनी दिले.
NCMC कार्ड असूनही नाकारले अर्धे तिकीट; नेटवर्कअभावी द्यावे लागले पूर्ण भाडे
भरती बाहेरच्या संस्थेकडून होणार असली तरी, निवड ही एसटीने ठरवलेल्या नियमांनुसारच होणार आहे. कुणाच्या ओळखीने, कुणाच्या पैशाने नोकरी मिळणार नाही, असं त्यांनी साफ सांगितलंय.
महामंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही खासगी संस्था गरजू व बेरोजगार तरुणांना नोकरीचे प्रलोभन दाखवत त्यांच्याकडून अवैधरित्या पैसे उकळत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत.आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फसवणूक. एसटीच्या नावावर काही खाजगी संस्था पोरांना फसवतायत, अशी तक्रार आलीय. गरजू आणि बेरोजगार पोरांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातायत. नोकरीच्या आशेने पोरं पैसे देतात आणि नंतर हातात काहीच लागत नाही.
अशा प्रकारांमुळे नोकरीच्या आशेने असलेल्या तरुणांची आर्थिक फसवणूक होत असून, त्याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या प्रतिमेवर होत आहे. काही समाजकंटकांच्या गैरकृत्यांमुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन होणे ही गंभीर बाब असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. यासाठी सरनाईक यांनी कडक निर्देश दिलेत. एसटी महामंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदा प्रकारांची सुरक्षा व दक्षता विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या संस्था व संबंधित व्यक्तींची ओळख पटवून दोषींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावेत.म्हणजे जो कोणी एसटीच्या नावावर पैसे मागत असेल, त्याच्यावर थेट गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे पोरांनो, लक्षात ठेवा, एसटीची भरतीसाठी कोणी पैसे मागत असेल तर देऊ नका. तो फ्रॉड आहे. अधिकृत जाहिरात आल्याशिवाय कुणावरही विश्वास ठेवू नका.
आता दुसरी बातमी, जी एसटीसाठी वाईट आहे. NCMC कार्डच्या सक्तीचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या महसुलावर झाला आहे.NCMC कार्ड सक्तीचं केल्याने एसटीला मोठा फटका बसलाय. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये एसटीच्या तोट्यात तब्बल 150 कोटी रुपयांची वाढ झाली.
महिनाभरातील एकूण तोटा 240 कोटी रुपयांहून अधिक नोंदवला आहे.एकीकडे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू असताना चुकीचे धोरणात्मक निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम महामंडळाच्या तिजोरीवर झाला आहे.एनसीएमसी कार्डची उपलब्धता आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाही कार्ड सक्तीने लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्डच सगळ्यांकडे नव्हतं, नोंदणी पण पूर्ण झाली नव्हती, तरी पण सक्ती केली. राज्यातील केवळ 43 टक्के महिलांकडेच एनसीएमसी स्मार्ट कार्ड असताना उर्वरित महिला प्रवाशांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागला.फक्त 43 टक्के महिलांकडेच कार्ड होतं. बाकीच्या 57 टक्के महिलांना अडचण झाली. त्यांना तिकीट काढता येईना, बस मध्ये चढता येईना. परिणामी, महिला प्रवाशांसह त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांनीही एसटीकडे पाठ फिरवली.
प्रवासी संख्या घटली. प्रवासी कमी झाले की उत्पन्न कमी होणारच. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये एसटीच्या तोट्यात तब्बल 150 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. महिनाभरातील एकूण तोटा 240 कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती आहे. त्यामुळे दैनंदिन तोटा थेट सात कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
रोज 7 कोटीचा तोटा, म्हणजे विचार करा किती मोठं नुकसान आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर महामंडळाला खडबडून जाग आली आणि 7 नोव्हेंबरपासून स्मार्ट कार्ड सक्तीच्या निर्णयात शिथिलता दिली. मात्र, आर्थिक नुकसानीची भरपाई कशी करायची, हा मोठा प्रश्न महामंडळासमोर आहे. दिवाळीच्या पहिल्या दहा दिवसांतही अपेक्षित उत्पन्नवाढ न झाल्याने एसटीच्या आर्थिक अडचणीत अधिकच वाढ होणार आहेत.
दिवाळीत तरी चांगलं उत्पन्न येईल, असं वाटलं होतं. पण दिवाळीच्या पहिल्या 10 दिवसात पण अपेक्षित उत्पन्न आलं नाही. त्यामुळे एसटीची अडचण अजूनच वाढलीय.थोडक्यात, एकीकडे 13,980 पोरांना नोकरीची संधी मिळणार आहे, ही चांगली बातमी आहे. पण दुसरीकडे NCMC च्या गडबडीमुळे एसटीला 150 कोटींचा फटका बसलाय. आता महामंडळ हे नुकसान कसं भरून काढणार, हे बघायचं आहे.






