Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

Engineering Admission 2026 : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या CAP फेरीअखेर 2 लाख 3 हजार 293 उपलब्ध जागांपैकी 1 लाख 52 हजार 452 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. Computer Engineeringला सर्वाधिक पसंती मिळाली असून पुणे जिल्हा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आघाडीवर आहेत.

  • By विवेक
Updated On: Sep 11, 2026 | 08:49 PM
Engineering Admission 2026

Engineering Admission 2026

Follow Us
Follow Us:
  • चौथ्या फेरीअखेर 1,52,452 विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी प्रवेश
  • Computer Engineeringला सर्वाधिक 23,230 विद्यार्थ्यांची पसंती
  • संस्थात्मक फेरीसाठी 50,841 जागा उपलब्ध; प्रवेश 14 सप्टेंबरपर्यंत
 

नीता परब / मुंबई,नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियाच्या ( Engineering Admission 2026 ) चार फेऱ्या राबविल्या गेल्या. या चार फेऱ्यामध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या २ लाख ३ हजार २९३ उपलब्ध जागेपैकी १ लाख ५२ हजार ४५२ म्हणजे ७४.९९ % विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यावर्षी कॅप फेऱ्यामध्ये सर्वाधिक प्रवेश संगणक अभियांत्रिकी या विषयामध्ये झाले आहेत. व सर्वात जास्त प्रवेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले आहेत. तर जिल्ह्यानुसार सर्वाधिक प्रवेश पुणे जिल्ह्यात झाले आहेत.

राज्यात यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी २ जुलै पासून सुरु झाली होती. १९ जुलैला ही ऑनलाईन नोंदणी संपली. यावर्षी २ लाख ४५ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांसाठी राज्यात ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १११ अभ्यासक्रम उपलब्ध असून, यामध्ये २ लाख १८ हजार ९७६ जागा (व्यवस्थापन कोट्यासह) उपलब्ध आहेत. यापैकी प्रवेश प्रक्रियामध्ये २ लाख ३ हजार २९३ जागा उपलब्ध होत्या, चौथ्या फेरीअखेर ७४.९९ % म्हणजे १ लाख ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी राज्यातील १७ विद्यापीठातील ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयात व अभियांत्रिकीच्या १११ विषयांच्या शाखेमध्ये प्रवेश घेतले आहेत.

संस्थात्मक फेरीसाठी ५० हजार ८४१ जागा उपलब्ध

सीईटी कक्षाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाच्या चार फेऱ्या झाल्या असून सध्या संस्थात्मक फेरी व व्यवस्थापन फेरीचे प्रवेश सुरु असून हे सर्व प्रवेश १४ सप्टेंबर पर्यंत राहणार आहेत. संस्थात्मक फेरी साठी कॅपमधून शिल्लक राहिलेल्या ५० हजार ८४१ जागा उपलब्ध आहेत. तर व्यवस्थापन कोट्यात १५ हजार ६८३ जागा उपलब्ध आहेत.

CAT Exam 2026: इंग्रजी कच्चे आहे? मग ‘अशा’ प्रकारे करा CAT परीक्षेची तयारी, ९९ पर्सेंटाईल मिळवणे होईल सोपे!

सर्वाधिक प्रवेश संगणक अभियांत्रिकी शाखेला

यावर्षी चौथ्या फेरीअखेर अभियांत्रिकीच्या १११ विषयांच्या शाखेमधून संगणक अभियांत्रिकी या शाखेमध्ये सर्वाधिक २३ हजार २३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यानंतर अनुक्रमे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सिव्हील इंजिनियरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग या शाखेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

विद्यापीठांतर्गत पुणे विद्यापीठात सर्वाधिक प्रवेश

सीईटी कक्ष राज्यातील सार्वजनिक १७ विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश करते. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियानुसार चौथ्या फेरीअखेर राज्यात सर्वाधिक ५३ हजार ९७३ विद्यार्थ्यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला, या खालोखाल ३० हजार ९०९ विद्यार्थ्यांनी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला, यानंतर २५ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी मुंबईतील मुंबई विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तसेच १४ हजार ०२४ विद्यार्थ्यांनी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व ८ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

जिल्हानिहायमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश

सीईटी कक्षाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या चौथ्या फेरीअखेर राज्यात जिल्हानिहाय प्रवेशामध्ये ४१ हजार १२२ विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. या खालोखाल १५ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नागपूर जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. यानंतर १० हजार ५७० विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तसेच ९ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी कोल्हापूर व ९ हजार १२ विद्यार्थ्यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.

UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!

कॅपमध्ये झालेले विषयानुसार प्रवेश (पहिले दहा)

१.कॉम्प्युटर इंजिनियरिंग – २३,२३०

२.मेकॅनिकल इंजिनिअरिंग – १६,९१८

३.इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग – १५,९७१

४.कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग – १५,७८७

५.इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – १२,४९४

६. सिव्हील इंजिनियरिंग – १२,०९५

७.इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग – १०,१९२

८.आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स – ८,८१६

९. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ) – ५,४८०

१०. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग – ३,९३६

विद्यापीठांतर्गत झालेले अभियांत्रिकीचे प्रवेश (पहिले पाच)

१.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – ५३,९७३

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे – ३०,९०९

३. मुंबई विद्यापीठ, मुंबई – २५,३५८

४. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर – १४,०२४

५.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – ८,४१६

Web Title: Engineering admission 2026 maharashtra cap round 4 1 52 lakh admissions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • Career News
  • Engineering College

संबंधित बातम्या

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
1

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.