Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditi Tatkare: AI, रोबोटिक्सचे शिक्षण आता ग्रामीण भागातही! आदिती तटकरे यांनी मांडली महत्त्वाची भूमिका

Aditi Tatkare: पुढील पाच वर्षांत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणाच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे तसेच शासन आणि शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये समन्वय वाढविणे आवश्यक असल्याचे मंत्री तटकरे यांनी नमूद केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2026 | 02:35 AM
Minister Aditi Tatkare

Minister Aditi Tatkare

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचविण्यास शासन प्रयत्नशील
  • ‘एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क’च्या दोन दिवसीय उपक्रमाचे उद्घाटन
  • शाळांमध्ये डिजिटल बोर्ड लवण्याबाबत प्रशिक्षण 
मुंबई/Aditi Tatkare: डिजिटलायझेशनच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर वाढत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शहरी भागासह ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत जागतिक दर्जाचे आधुनिक शिक्षण पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या समान संधी मिळण्यासाठी जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये अनुवादित करून सोप्या स्वरूपात उपलब्ध करण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

गोरेगांव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात ‘एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क’च्या दोन दिवसीय ‘एज्युकेशन कनेक्ट एक्स्पो’चे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी एज्युकेशन ग्रोथ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉली सिंग उपस्थित होत्या. शिक्षण क्षेत्रातील नव्या संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शैक्षणिक विकासाच्या विविध पैलूंवर या उपक्रमात विचारमंथन होत आहे. या चर्चासत्रातून पुढे येणाऱ्या सूचना आणि निष्कर्षांचा राज्याच्या प्रस्तावित बालधोरणात समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.

Lagn Aani Barach Kahi: लग्नाच्या पलीकडची गोष्ट! ‘लग्न आणि बरंच काही’मधून उमटणार स्त्रीशक्तीचा नवा आवाज

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणेही महत्वाचे आहे. वाढती स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा आणि शैक्षणिक गुंतवणुकीमुळे मुलांवर येणारा मानसिक ताण लक्षात घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याची गरज आहे. सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये खासगी शाळांतील विद्यार्थ्यांपेक्षा आपण कमी नाही, हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शाळांमधील पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर शासन भर देत आहे.

एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क, शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयातून काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि उपक्रम राबविण्याबाबत शासन विचार करेल. पुढील पाच वर्षांत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणाच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे तसेच शासन आणि शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये समन्वय वाढविणे आवश्यक असल्याचे मंत्री तटकरे यांनी नमूद केले.

डिजिटल शिक्षणासाठी शाळांमध्ये डिजिटल बोर्ड बसविण्याबरोबरच शिक्षकांना त्यांचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी किमान दोन दिवसांचे (४८ तासांचे) प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांचे मानसिक आरोग्य आणि कल्याणही महत्वाचे आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाच्या अडचणींचा एकत्रित विचार करून त्या सोडविण्यात येणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. प्रदर्शनात ६० ते ७० स्टॉल्स उभारण्यात आले होते. डिजिटल बोर्डद्वारे शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, शाश्वत विकासाशी संबंधित उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधने आणि सुविधांची माहिती या स्टॉल्सच्या माध्यमातून देण्यात आली.

State Level Innovation Competition: शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांसाठी खूशखबर! एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईच्या गोरेगाव कसले उद्घाटन झाले?

    Ans: गोरेगाव येथे ‘एज्युकेशन कनेक्ट एक्स्पो’चे उद्घाटन झाले.

  • Que: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या?

    Ans: दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत जागतिक दर्जाचे आधुनिक शिक्षण पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे, मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.

Web Title: Minister aditi tatkare development on tribal rural areas education system career tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Aaditi Tatkare
  • Career News
  • education news

संबंधित बातम्या

अवघ्या अर्ध्या तासात मिळणार ‘शालार्थ आयडी’; हेलपाटे मारणे आता होणार कमी
1

अवघ्या अर्ध्या तासात मिळणार ‘शालार्थ आयडी’; हेलपाटे मारणे आता होणार कमी

Importance of Mathematics: गणित विषयाला घाबरता? एकदा हा दृष्टिकोन समजून घ्या, प्रत्येक गणिती कोडं वाटेल सोपं!
2

Importance of Mathematics: गणित विषयाला घाबरता? एकदा हा दृष्टिकोन समजून घ्या, प्रत्येक गणिती कोडं वाटेल सोपं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.