Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Engineers Day 2026: पुण्याच्या COEP मधून शिकलेला ‘हा’ मुलगा कसा बनला भारताचा सर्वात मोठा इंजिनिअर? जाणून घ्या

Engineers Day 2026: भारतातील महान अभियंत्यांमध्ये सर मोक्षडम विश्वेश्वरय्या यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन, त्यांचा जन्मदिवस १५ सप्टेंबर हा 'इंजिनिअर्स डे' म्हणून साजरागुं केला जातो.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 14, 2026 | 10:11 PM
engeirning

engeirning

Follow Us
Follow Us:

Engineers Day 2026: भारतातील महान अभियंत्यांमध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन, त्यांचा जन्मदिवस १५ सप्टेंबर हा ‘इंजिनिअर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. अवाढव्य धरणे, जलव्यवस्थापन ते औद्योगिक विकासापर्यंत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मूर्त रूप देण्यात एम. विश्वेश्वरय्या यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.

विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकातील मुद्देनहल्ली येथे झाला. त्यांनी पुण्यातील ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ (COEP) मधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात काम सुरू केले. पुढे ते म्हैसूर राज्याचे मुख्य अभियंता बनले. त्यांच्या या महान योगदानाबद्दल त्यांना १९५५ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात आले.

एम. विश्वेश्वरय्या यांचे अभियांत्रिकी क्षेत्रातील ऐतिहासिक योगदान:

कृष्णराज सागर (KRS) धरण, म्हैसूर:

एम. विश्वेश्वरय्या यांच्या महान कार्यांमध्ये कृष्णराज सागर धरणाचे नाव सर्वात वर येते. कावेरी नदीवर बांधलेल्या या धरणाचे नियोजन आणि अभियांत्रिकी रचनेमध्ये विश्वेश्वरय्या यांची मुख्य भूमिका होती. या प्रकल्पामुळे म्हैसूर आणि आसपासच्या भागात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भक्कम झाली.

Aditya Thackeray News: दिशा सालियान प्रकरणावरून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे किती शिकलेत? जाणून घ्या शिक्षण अन् एकूण संपत्ती

हैदराबादची पूर-नियंत्रण प्रणाली:

१९०८ मध्ये हैदराबादमध्ये मुसी नदीला विनाशकारी पूर आला होता. यानंतर शहराला पुराच्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी विश्वेश्वरय्या यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी हैदराबादमध्ये पूर-नियंत्रण, ड्रेनेज सिस्टीम आणि जलाशयांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. त्यांच्या सल्ल्यामुळे शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी आधुनिक यंत्रणा विकसित करण्यात आली.

स्वयंचलित स्लुइस गेट सिस्टीम:

एम. विश्वेश्वरय्या यांनी जलाशयांमधील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी एक नाविन्यपूर्ण ऑटोमॅटिक गेट सिस्टीम शोधून काढली, ज्याला ‘स्लुइस गेट’ म्हटले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर पुढे भारतातील अनेक मोठ्या धरणांमध्ये करण्यात आला.

Rishabh Sambyal Resign: अवघ्या ३० व्या वर्षी मेजर ऋषभ संब्याल निवृत्त! पेन्शन मिळणार की नाही? वाचा लष्कराचा नियम

विशाखापट्टणम बंदर संरक्षण:

विशाखापट्टणम बंदराला समुद्राच्या वाळूमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षेसाठी विश्वेश्वरय्या यांचा विशेष सल्ला घेण्यात आला होता.

म्हैसूर राज्याचा औद्योगिक विकास:

ते भारतातील औद्योगिकीकरणाचे मोठे पुरस्कर्ते होते. १९१२ ते १९१८ या काळात म्हैसूरचे दिवाण म्हणून काम करताना त्यांनी उद्योग, शिक्षण, बँकिंग आणि तांत्रिक संस्थांच्या विकासावर भर दिला. म्हैसूरमधील अनेक औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

Web Title: Engineers day 2026 sir m visvesvaraya birth anniversary contributions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • day history
  • education
  • Engineer's Day

संबंधित बातम्या

Aditya Thackeray News: दिशा सालियान प्रकरणावरून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे किती शिकलेत? जाणून घ्या शिक्षण अन् एकूण संपत्ती
1

Aditya Thackeray News: दिशा सालियान प्रकरणावरून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे किती शिकलेत? जाणून घ्या शिक्षण अन् एकूण संपत्ती

UPSC NDA 2 Exam 2026: ‘या’ विषयांच्या प्रश्नांनी उमेदवारांना फिरवले चक्रावून; जाणून घ्या पेपरचा संपूर्ण रिव्ह्यू
2

UPSC NDA 2 Exam 2026: ‘या’ विषयांच्या प्रश्नांनी उमेदवारांना फिरवले चक्रावून; जाणून घ्या पेपरचा संपूर्ण रिव्ह्यू

Opportunity for Engineering Students: बंगळुरू DRDO मध्ये रिसर्च शिकण्याची संधी; ११ ऑक्टोबरपर्यंत करा ई-मेल द्वारे अर्ज
3

Opportunity for Engineering Students: बंगळुरू DRDO मध्ये रिसर्च शिकण्याची संधी; ११ ऑक्टोबरपर्यंत करा ई-मेल द्वारे अर्ज

Career Guidance 2026: १२ वी नंतर ‘हे’ ५ कोर्सेस घेण्यापूर्वी एकदा विचार करा; पैसा अन् वेळ दोन्ही होईल वाया!
4

Career Guidance 2026: १२ वी नंतर ‘हे’ ५ कोर्सेस घेण्यापूर्वी एकदा विचार करा; पैसा अन् वेळ दोन्ही होईल वाया!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.