Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड

GMC Hingoli Bharti 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली येथे अभ्यागत अध्यापक संवर्गातील एकूण ७ रिक्त पदे मानधनावर भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 02, 2026 | 01:04 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७ रिक्त पदांसाठी भरती जाहीर
  • मुलाखतीसाठी ‘या’ ठिकाणी उपस्थित रहावे
  • उमेदवाराकडे कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?
GMC Hingoli Bharti 2026: सरकारी नोकरीची तयारी करत मेडिकलच्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे ‘अभ्यागत अध्यापक’ (Visiting Faculty) या संवर्गातील रिक्त पदे एकत्रित मानधनावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, एकूण ७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये औषधवैद्यकशास्त्र (२ पदे), शल्यचिकित्साशास्त्र (२ पदे), स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र (२ पदे) आणि कान, नाक व घसाशास्त्र (१ पद) या विविध वैद्यकीय शाखांचा समावेश आहे.

उमेदवाराकडे कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच उमेदवाराकडे संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमडी, एमएस किंवा डीएनबी (MD/MS/DNB) पदवी असणे आवश्यक असून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (MMC) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. जे उमेदवार इतर शासकीय किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत, त्यांनी संबंधित संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) आणि नियुक्ती आदेशाची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

मुलाखतीसाठी ‘या’ ठिकाणी उपस्थित रहावे

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि अर्जासह दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली येथे स्वखर्चाने थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी उमेदवारांना कोणतेही स्वतंत्र पत्र पाठवले जाणार नाही. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि अध्यापनाची आवड असणाऱ्या अनुभवी डॉक्टरांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली असून, याविषयीची सविस्तर माहिती महाविद्यालयाच्या जाहिरात फलकावर व संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Consumer Protection Council: बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २४ अशासकीय सदस्यांची होणार निवड; असा करा अर्ज

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोणत्या पदांसाठी भरती होत आहे?

    Ans: महाविद्यालयात 'अभ्यागत अध्यापक' (Visiting Faculty) या संवर्गातील विविध विभागांतील एकूण ७ रिक्त पदांसाठी भरती होत आहे.

  • Que: मुलाखतीची तारीख आणि वेळ काय आहे?

    Ans: मुलाखत १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता सुरू होईल आणि पदे भरेपर्यंत चालणार आहे.

  • Que: मुलाखतीचे ठिकाण कोणते आहे?

    Ans: मुलाखत अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली येथे घेण्यात येईल.

Web Title: Gmc hingoli bharti 2026 walk in interview sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • education
  • Interview for Jobs
  • Medical

संबंधित बातम्या

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!
1

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!

Medical Officer Recruitment 2026: डॉक्टरांसाठी खूशखबर! भारतीय सशस्त्र दलात ‘मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती; असा करा अर्ज
2

Medical Officer Recruitment 2026: डॉक्टरांसाठी खूशखबर! भारतीय सशस्त्र दलात ‘मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती; असा करा अर्ज

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड
3

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड

PMC School Student News: मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलासा; महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप
4

PMC School Student News: मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलासा; महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.