Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ESIC IMO भरतीला होणार सुरुवात; ६०८ पदांसाठी जागा रिक्त

या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेपासून वयोमर्यादेपर्यंत सर्व गोष्टींची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज प्रक्रिया करावी.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 19, 2024 | 05:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

एम्प्लॉयीस स्टेट इन्शुरन्स कंपनी (ESIC)मध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. इन्शुरन्स मेडिकल ऑफिसर ग्रेड-II च्या पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. एकूण ६०८ रिक्त जागांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरती संबंधित सखोल माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण भारतभरातून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ESCI च्या esic.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती संदर्भात सखोल माहिती :

ISRO HSFCने प्रवेशपत्र केले जाहीर; २ जानेवारी रोजी होणार परीक्षा

उमेदवारांना आजपासून अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, १९ डिसेंबर २०२४ पासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर ३१ जानेवारी २०२५ या तारखेपर्यंत अर्जाची विंडो खुली ठेवण्यात येणार आहे. काही ठराविक आरक्षित वर्गांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण ६०८ जागांचा विचार केला जाणार आहे. यामध्ये २५४ जागा सामान्य श्रेणीसाठी राखीव आहेत. ६३ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. ५३ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. १७८ जागा OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. ६० जागा EWS प्रवर्गासाठी, २८ जागा PwBD (C) तसेच ६२ जागा PwBD (D & E) या प्रवर्गासाठी राखीव आहेत.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही विशिष्ट अटी आणि शर्ती पूर्ण करणे अनिवार्य आहे. या अटी आणि शर्ती मुख्यतः उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात तसेच वयोमर्यादेबाबत लागू आहेत. त्यामुळे अर्जदारांनी या अटींची तपशीलवार माहिती घेतल्याशिवाय अर्ज करणे टाळावे.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात विविध अभ्यासक्रमांची सुरुवात, प्रवेशासाठी अर्ज सुरू

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला MBBS अर्थात वैद्यकीय पदवीधर असणे गरजेचे आहे. म्हणजेच, उमेदवाराने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि त्याला त्याचा अधिकृत पदवी प्रमाणपत्र मिळालेले असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराने किमान प्रशिक्षणार्थी (इंटर्नशिप) म्हणून ठराविक कालावधीसाठी काम केलेले असावे. इंटर्नशिपचा अनुभव उमेदवारांच्या व्यावसायिक कौशल्यांवर प्रकाश टाकतो आणि त्याला भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते.अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी जास्तीत जास्त ३५ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. उमेदवारांची नियुक्ती CMSE २०२२ आणि २०२३ च्या मेरिटवर आधारित केली जाणार आहे.

अशा प्रकार करता येईल अर्ज

  • उमेदवारांनी अधिकृत ESIC संकेतस्थळ esic.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्ज फॉर्म भरण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी सबमिट केलेल्या अर्जाची प्रत जपून ठेवावी.

Web Title: Esic imo recruitment to begin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 05:52 PM

Topics:  

संबंधित बातम्या

राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
1

राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.