पतसंस्था व शिक्षक यांनाही कामगार विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी शिबिरे आयोजित करावीत आणि सुविधा वाढवण्याचे प्रयत्न करावेत.
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेपासून वयोमर्यादेपर्यंत सर्व गोष्टींची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज प्रक्रिया करावी.
वालावलकर रुग्णालयात कर्मचारी राज्य विमा योजना ०१ मे २०२४ पासून सुरु झाली आहे. या अंतर्गत विमा असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
मुंबईतील ईएसआय न्यायालयाने या वर्षाच्या सुरुवातीला आदेश देत बीसीसीआयमधील कर्मचारी हे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट अंतर्गत राज्य विमा (ईएसआय) कायद्यांतर्गत लाभ मिळण्यास पात्र असल्याचे स्पष्ट केले. त्यानिर्णयाला बीसीसीआय उच्च न्यायालयात आव्हान…