Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार! प्राचार्य उद्या अहवाल सादर करणार, दोन केंद्रावर घेतल्या परीक्षा

हतनूर येथील राष्ट्रीय महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा कन्नड येथील पर्यायी केंद्रांवर सुरळीत पार पडली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 22, 2026 | 02:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

हतनूर येथील राष्ट्रीय महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा कन्नड येथील पर्यायी केंद्रांवर सुरळीत पार पडली. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुवारी परीक्षा विभागाकडे सादर करणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.

वन्यजीव संवर्धनात उज्ज्वल भविष्य! पर्याय ऐकाल तर म्हणाल “आता यातच घडवायचं मला करिअर!”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.कॉम. परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा गंभीर प्रकार कन्नड तालुक्यातील हतनूरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात उघडकीस आला होता. या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ कठोर भूमिका घेत संबंधित परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच या प्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी दिले आहेत.

प्रश्नपत्रिका व्हायरल झालेल्या विषयाची परीक्षा आता ४ मे रोजी नव्याने घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली. हतनूर केंद्रावरील सर्व विद्यार्थ्यांची मंगळवारपासूनची परीक्षा कन्नड येथील शिवाजी महाविद्यालय आणि संत तुकाराम महाविद्यालय या दोन केंद्रांवर हलविण्यात आली. या दोन्ही केंद्रांवर मंगळवारी घेण्यात आलेली परीक्षा पूर्णपणे सुरळीत पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भोसले तसेच संत तुकाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली होती.

दहावी बारावीच्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात; फॉर्म क्र. १७ द्वारे नावनोंदणी सुरू

दरम्यान, प्रश्नपत्रिका डाउनलोड करून ती बाहेर व्हायरल केल्याच्या आरोपावरून संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध ४८ तासांच्या आत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या घटनेचा सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर करण्याबाबत महाविद्यालय प्रशासनाला सूचित करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे परीक्षा व्यवस्थेतील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले, तरी विद्यापीठाने तातडीने उपाययोजना करत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र समोर आले आहे.

Web Title: Exams for those students conclude smoothly principal to submit report tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Career
  • education

संबंधित बातम्या

BRICS Education: भविष्यातील रोजगाराचे गणित कसे बदलणार? जाणून घ्या ब्रिक्सचा नवा एजेंडा!
1

BRICS Education: भविष्यातील रोजगाराचे गणित कसे बदलणार? जाणून घ्या ब्रिक्सचा नवा एजेंडा!

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……
2

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….
3

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….

UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!
4

UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.