फोटो सौजन्य - Social Media
एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (EXIM Bank) कडून मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee), डिप्टी मॅनेजर (Deputy Manager) आणि चीफ मॅनेजर (Chief Manager) या विविध पदांसाठी थेट भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 22 मार्च 2025 ते 15 एप्रिल 2025 पर्यंत आहे.
ही भरती विविध शाखांसाठी करण्यात येत असून यामध्ये डिजिटल टेक्नोलॉजी, संशोधन व विश्लेषण, कायदेशीर सेवा आणि राजभाषा विभाग यांचा समावेश आहे. उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक भारतातील कोणत्याही ठिकाणी केली जाऊ शकते.
उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहे. मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी अनारक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी २८ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी ३१ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे, तर SC आणि ST साठी ही मर्यादा ३३ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. डिप्टी मॅनेजर पदासाठी अनारक्षित/EWS प्रवर्गातून असणारा उमेदवार 30 वर्षे असणे अनिवार्य आहे. तर OBC प्रवर्गातून येणारा उमेदवार ३३ वर्षे असणे अनिवार्य आहे. चीफ मॅनेजर पदासाठी अनारक्षित/EWS उमेदवार 40 वर्षे असणे आवश्यक आहे. तर PwBD उमेदवारांना 10 वर्षांची सवलत दिली जाईल.
नियुक्ती मिळवण्यासाठी लिखित परीक्षा पात्र करणे अनिवार्य आहे. ही परीक्षा प्रोफेशनल नॉलेज या विषयावर आधारित असणार आहे. परीक्षेचा कालावधी २ तास ३० मिनिटे इतका असणार आहे. उमेदवारांना व्यक्तिगत मुलाखतीसाठी सज्ज व्हावे लागेल. अंतिम निवड यादी तयार करताना: लिखित परीक्षेत किमान 70% गुण असणे आवश्यक आहे. तर मुलाखतीत 30% गुण असणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे करा अर्ज:
अधिक माहितीसाठी EXIM Bank ची अधिकृत वेबसाइट पहा.