Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC अभियांत्रिकी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांसाठी खुशखबर! मुलाखत तयारीसाठी बार्टीतर्फे आर्थिक सहाय्य

MPSC अभियांत्रिकी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बीटीतर्फे मुलाखतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 20, 2025 | 02:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रवास तसेच तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
  • अर्जाची प्रत २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बार्टी कार्यालयात पोहोचणे आवश्यक
  • अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास बार्टी प्रशासनाने व्यक्त केला
राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची दिलासादायक घोषणा करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यातर्फे एमपीएससी अभियांत्रिकी सेवांच्या मुलाखत तयारीसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२४ मध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना या योजनेंतर्गत एकरकमी १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अधिकाधिक उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे. मुलाखत प्रक्रियेदरम्यान होणारा आर्थिक खर्च, मार्गदर्शन वर्ग, प्रवास तसेच तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Murtizapur News: पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांचे विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ०५४/२०२५ क्रमांकाच्या अधिसूचनेनुसार १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या एमपीएससी अभियांत्रिकी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेले असणे अनिवार्य आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असून, उमेदवारांनी बार्टीच्या अधिकृत लिंकवर जाऊन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी आणि आवश्यक माहिती भरण्यासाठी https://forms.gle/nkVisRqm-ndp1qpAM9 या लिंकवर फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची स्व-साक्षांकित प्रत व आवश्यक कागदपत्रे बार्टी, पुणे कार्यालयात प्रत्यक्ष पाठविणे बंधनकारक आहे.

अर्जाची प्रत २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बार्टी कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता — डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८, कीन्स गार्डन, कॅम्प, पुणे – ४११००१ असा आहे. अर्जाच्या लिफाफ्यावर स्पष्टपणे ‘एम.पी.एस.सी. अभियांत्रिकी २०२५ मुलाखतीसाठी आर्थिक सहाय्य’ असे नमूद करणे अनिवार्य असल्याचे बार्टी कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे. अर्जासंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ०२०-२६३३३३३० किंवा ०२०-२६३३३३३९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. एकाच उमेदवाराने वेगवेगळी माहिती भरून एकापेक्षा जास्त वेळा अर्ज केल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

नोकरी मिळाली नाही तर भाऊ उतरला रस्त्यावर! पोस्टर घेऊन फिरू लागला गल्लोगल्लीत 

ही योजना अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणवंत उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांमधील शेवटचा टप्पा यशस्वीरीत्या पार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास बार्टी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Web Title: Financial assistance for candidates who have passed the mpsc engineering exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • MPSC
  • MPSC Exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.