Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!

अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या GATE 2027 परीक्षेच्या ऑनलाइन अर्जाची नियमित मुदत उद्या संपत आहे. लेट फीसह ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत असून पात्रता, परीक्षा पॅटर्न आणि शुल्काचबद्दल सविस्तर जाणून घ्या .

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 26, 2026 | 03:33 PM
gate 2027

gate 2027

Follow Us
Follow Us:

GATE 2027 Application Date Extended: अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठीची अत्यंत महत्त्वाची परीक्षा असलेल्या ‘गेट २०२७’ (GATE 2027) साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, अर्जाची नियमित मुदत उद्या म्हणजेच २७ सप्टेंबर २०२६ रोजीपर्यंत आहे. ज्या पात्र उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नाही, त्यांनी तात्काळ अधिकृत GOAPS पोर्टलवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते, ज्याचे आयोजन नॅशनल कोऑर्डिनेशन बोर्ड (NCB), उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली IISc आणि सर्व IITs मिळून करतात, तर २०२७ च्या परीक्षेचे मुख्य आयोजन संस्थान ‘IIT मद्रास’ हे आहे.

जे उमेदवार उद्या म्हणजेच २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी लेट फीसह अर्ज करण्याची वाढीव मुदत ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत उपलब्ध असणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://goaps.iitm.ac.in/login वर भेट देऊन डिजीलॉकरच्या (DigiLocker) माध्यमातून पडताळणी करून नवीन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर वैयक्तिक तपशील, शैक्षणिक माहिती, पेपरची निवड, परीक्षा शहर निवडून फोटोग्राफ, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन फी भरून अर्ज यशस्वीरीत्या सबमिट करता येईल.

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क

या परीक्षेसाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला, विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेत पदवी पूर्ण केलेले किंवा सध्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत. तसेच विद्यार्थी नियमांनुसार उपलब्ध ३० वेगवेगळ्या विषयांपैकी एक किंवा दोन विषयांची निवड करून परीक्षा देऊ शकतात.

NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा

नियमित कालावधीत अर्ज करताना महिला, एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी प्रति पेपर १,००० रुपये शुल्क आकारले जाईल, तर इतर सर्व प्रवर्गातील (सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस) उमेदवारांसाठी प्रति पेपर २,००० रुपये शुल्क आहे.

परीक्षा पॅटर्न आणि गुणांकन

गेट २०२७ च्या परीक्षा पॅटर्ननुसार, परीक्षेसाठी ३ तासांचा वेळ दिला जातो आणि संपूर्ण पेपर १०० गुणांचा असतो. यामध्ये जनरल अष्टिट्यूडचे १५ गुण असतात, तर उर्वरित ८५ गुण उमेदवाराने निवडलेल्या विषयावर आधारित असतात. प्रश्नांच्या स्वरूपात बहुपर्यायी प्रश्न, बहु-निवडक प्रश्न आणि न्यूमेरिकल आन्सर टाईप (NAT) प्रश्नांचा समावेश असतो.

Australia Salary System: ऑस्ट्रेलियन जॉब मार्केटचे मोठे गुपित; महिन्याच्या शेवटी नाही, तर ‘या’ दिवसाला मिळतो पगार!

एमसीक्यू (MCQ) प्रकारच्या प्रश्नांमध्ये चुकीचे उत्तर दिल्यास निगेटिव्ह मार्किंग असते, ज्यामध्ये १ गुणाच्या चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश आणि २ गुणांच्या चुकीच्या उत्तरासाठी दोन तृतीयांश गुण वजा केले जातात. मात्र, एमएसक्यू (MSQ) आणि एनएटी (NAT) प्रश्नांसाठी कोणतीही नकारात्मक गुणदान पद्धत नाही. ही परीक्षा केवळ इंग्रजी भाषेत घेतली जाते.

Web Title: Gate 2027 application dates eligibility fees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • competitive exam
  • education
  • Engineering

संबंधित बातम्या

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!
1

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
2

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
3

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
4

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.